Marathi Serial : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या...


1. टीआरपीच्या शर्यतीत 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.7 रेटिंग मिळाले आहे. 


2. 'रंग माझा वेगळा' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे.


3. टीआरपी लिस्टमध्ये 'आई कुठे काय करते' ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.4 रेटिंग मिळाले आहे. 


4. 'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका टीआरपी रिपोर्टनुसार चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेला 5.9 रेटिंग मिळाले आहे.


5. 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पाचव्या स्थानावर आहे. टीआरपी रिपोर्टनुसार या मालिकेला 5.3 रेटिंग मिळाले आहे.


6. 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका सहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.3 रेटिंग मिळाले आहे.  


7. टीआरपीच्या शर्यतीत 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.7 रेटिंग मिळाले आहे. 


8. 'स्वाभीमान' ही मालिका टीआरपी रिपोर्टमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.4 रेटिंग मिळाले आहे. 


9. नव्या स्थानावर 'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका आहे. या मालिकेला 4.2 रेटिंग मिळाले आहे. 


10. 'मन उडू उडू झालं' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.0 रेटिंग मिळाले आहे. 


'आई कुठे काय करते'च्या महा एपिसोडला 4.9 रेटिंग


'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका सलग दुसऱ्या आठवड्यात टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या स्थानावर 'रंग माझा वेगळा' ही मालिका आहे. तर 'मन उडू उडू झालं' मालिकेत सतत नवा ट्विस्ट येत असल्याने ही मालिका पुन्हा एकदा टीआरपीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर आली आहे. तर 'आई कुठे काय करते' या मालिकेच्या महा एपिसोडला 4.9 रेटिंग मिळाले आहे.   


संबंधित बातम्या


Man Udu Udu Zhala : प्रतीकच्या परवानगीने इंद्रा करणार दीपूसोबत लग्न; लवकरच होणार शूटिंगला सुरुवात


Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : निर्मात्यांनी तारक मेहता, दया अन् टप्पूचा शोध थांबवला? प्रेक्षकांना आणखी वाट पहावी लागणार!