Mika Singh Swayamvar : प्रसिद्ध गायक मिका सिंहच्या (Mika Singh) गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळते. लवकरच मिका विवाहबंधनात अडकणार आहे. 'स्टार भारत'च्या 'स्वयंवर: मिका दी वोटी' (Swayamvar: Mika Di Vohti) या शोमधून मिका आपली आयुष्यभराची जोडीदार निवडणार आहे. 19 जूनपासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. अनेक वेळा या शोमध्ये मिका हा त्याच्या रिलेशनशिपबाबत सांगतो. मिकानं त्याच्या एका एक्स गर्लफ्रेंडबाबत या शोमध्ये सांगितलं. 


मिकानं सांगितला किस्सा 


स्वंयवरामधील एका मुलीनं मिकाला एका अशा प्रसंगाबाबत विचारले जो कोणालाही माहित नसेल. त्या मुलीला मिकानं त्याच्या एक्स-गर्लफ्रेंडबद्दल सांगितलं. मिकानं सांगितलं की, त्याला तीन गर्लफ्रेंड्स होत्या. त्यामधील तिसऱ्या गर्लफ्रेंडबाबत मिकानं सांगितलं, 'मी जेव्हा माझ्या तिसऱ्या गर्लफ्रेंडसोबत रिलेशनशिपमध्ये होतो, तेव्हा माझी काही गाणी हिट झाली होती. माझ्याकडे बॉडीगार्ड होते. तेव्हा मी लाईमलाईटमध्ये होतो. तेव्हा मी एका मुलीला भेटलो. ती खूप सुंदर होती. एक गर्लफ्रेंड असताना देखील मी त्या मुलीसोबत बोलत होतो. मी त्या मुलीचं नाव राकेश असं सेव्ह केलं होतं. एकदा मी माझ्या गर्लफ्रेंडसोबत असताना त्या मुलीचा फोन आला. मी तो फोन उचलत नव्हतो. पण माझ्या गर्लफ्रेंडनं फोन उचलून स्पिकरवर करायला सांगितलं. राकेश नावानं नंबर सेव्ह केलेली मुलगी आहे, हे जेव्हा माझ्या गर्लफ्रेंडला समजलं तेव्हा तिनं मला कानशिलात लगावली. '


पुढे मिका म्हणाला, 'त्यानंतर मी विचार केला की ती मला सर्वांसमोर पण मारु शकते. त्यामुळे मी घाबरलो. त्यानंतर मी सर्व गोष्टी माझ्या त्या एक्स गर्लफ्रेंडला सांगत होतो. ' 


'स्वयंवर मिका दी वोटी' या कार्यक्रमात एकूण 12 मुली सहभागी झाल्या आहेत. देशभरातील विविध भागामधून या मुली स्वयंवरासाठी आल्या आहेत. 45 वर्षीय मिका सिंह 12 मुलींमधून एकीची निवड करणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशातील विविध कानाकोपऱ्यातून मुली आल्या आहेत. 12 मुलींमधून मिका जोडीदार म्हणून कोणाची निवड करणार, हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. 12 मुलींपैकी मिका लग्नासाठी कोणत्या मुलीची निवड करेल? या प्रश्नाचे उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे. मिका हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आहे. त्याच्या 'पार्टी तो बनती है', 'सुबह होने न दे', 'रानी तू मैं राजा' या गाण्यांमुळे मिकाला विशेष लोकप्रियता मिळाली. 


हेही वाचा:


Swayamvar Mika Di Vohti : मिका सिंहच्या स्वयंवरमध्ये मराठी विनोदवीरांच्या मुलीचा सहभाग; ध्वनी पवार बाजी मारणार का?


Swayamvar Mika Di Vohti : घोड्यावर बसून आलेल्या मिका सिंहने जिंकलं तरुणीचं मन, ‘गब्बर’ बनून केलं मनोरंजन!