Swayamvar: Mika Di Vohti : प्रसिद्ध गायक मिका सिंहच्या (Mika Singh) गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळते. लवकरच मिका विवाहबंधनात अडकणार आहे. 'स्टार भारत'च्या 'स्वयंवर: मिका दी वोटी' (Swayamvar: Mika Di Vohti) या शोमधून मिका आपली आयुष्यभराची जोडीदार निवडणार आहे. सध्या या स्वयंवरामध्ये मिकाला एक मुलगी आवडली आहे. स्वयंवर- मिका दी वोटीमध्ये मिकासोबत लग्न करण्याचे स्वप्न घेऊन अनेक सुंदर आणि हुशार मुली आल्या आहेत. एवढेच नाही तर प्रत्येक मुलगी मिकाला इम्प्रेस करण्याचे प्रयत्न करत आहेत. या कार्यक्रमात मुली मिकावरचं प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. पण, प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न उपस्थित होत आहे, तो म्हणजे मिका सिंहला या कार्यक्रमामधील कोणती मुलगी सर्वात जास्त आवडते.


फराह खाननं घेतली स्वयंवरातील मुलीची परीक्षा 
नुकतीच मिकाच्या स्वयंवरात फराह खाननं हजेरी लावली. फराह खान ही मिका सिंहला तिचा भाऊ मानते. त्यामुळे तिनं या शोमध्ये हजेरी लावली. स्वयंवरातील मुलींची फराहनं टेस्ट घेतली. यावेळी फराहनं मिकाला विचारलं की कोणती मुलगी त्याला सर्वात जास्त आवडते. 






मिकानं सांगितलं आवडत्या मुलीचं नाव 
'स्वयंवर: मिका दी वोटी' या कार्यक्रमाच्या एका एपिसोडचा प्रोमो व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये मिका स्वयंवरातील मुलींबाबत सांगिताना दिसत आहे. यावेळी मिकानं प्रांतिका नावाच्या मुलीबाबत सांगितलं.  फराह खानला मिकानं सांगितलं की  प्रांतिका ही त्याला सर्वात बेस्ट मुलगी वाटते. 


'स्वयंवर मिका दी वोटी' या कार्यक्रमात एकूण 12 मुली सहभागी झाल्या आहेत. देशभरातील विविध भागामधून या मुली स्वयंवरासाठी आल्या आहेत. 45 वर्षीय मिका सिंह 12 मुलींमधून एकीची निवड करणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशातील विविध कानाकोपऱ्यातून मुली आल्या आहेत. 


हेही वाचा :