Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीचे (Bigg Boss Marathi) तिसरे पर्व नुकतेच संपले आहे. त्यामुळे बिग बॉसचे चाहते हा कार्यक्रम मिस करत आहे. दरम्यान बिग बॉस मराठीच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. बिग बॉस मराठीचा चौथा सीझन लवकरच सुरू होणार आहे.
बिग बॉस मराठीचा चौथा सीझन 10 जुलैनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जून महिन्यापासून बिग बॉस मराठीचे प्रोमो आऊट व्हायला सुरुवात होणार आहे. बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाचा विशाल निकम विजेता ठरला होता. त्यामुळे बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात कोणते स्पर्धक असणार आणि कोण विजयी होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
बिग बॉस मराठीचे तीन सीझन महेश मांजरेकरांनी होस्ट केले आहेत. त्यामुळे चौथा सीझन कोण होस्ट करणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. बिग बॉसच्या चौथ्या पर्वात अनिता दाते, किरण माने, अभिजीत आमकर, रुचिता जाधव, शुभांगी गोखले, निखिल चव्हाण, मृणाल दुसानीस, अक्षय केळकर सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे.
संबंधित बातम्या