Sarkaru Vaari Paata : सध्या दाक्षिणात्य सिनेमे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. लवकरच महेश बाबूंचा (Mahesh Babu) 'सरकारु वारी पाटा' (Sarkaru Vaari Paata) सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. 


'सरकारु वारी पाटा' सिनेमात महेश बाबू अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. 'सरकारु वारी पाटा' सिनेमाचा ट्रेलर 2 मिनिटे 36 सेकंदाचा आहे. या सिनेमात अॅक्शनचा तडका असणार आहे.  ट्रेलरची सुरुवातच जबरदस्त अॅक्शनने होते. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनसह रोमान्सदेखील पाहायला मिळणार आहे. महेश बाबू आणि कीर्ती सुरेश या सिनेमात मुख्य भूमिकेत असणार आहेत.





'सरकारु वारी पाटा' सिनेमात महेश बाबू एका बॅंक मॅनेजरच्या भूमिकेत आहे. 'सरकारु वारी पाटा' सिनेमात 12 मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन परशुराम पेटला यांनी केलं आहे. सिनेमात महेश बाबू आणि कीर्ती सुरेश रोमॅंटिक अंदाजात दिसणार आहे. 


संबंधित बातम्या


Dnyaneshwar Mauli : 'ज्ञानेश्वर माऊली' मालिकेचे 200 भाग पूर्ण; प्रेक्षक भक्तिरसात तल्लीन


OTT Release This Week : 'थार'पासून 'झुंड'पर्यंत 'हे' सिनेमे आणि वेब सीरिज 'या' आठवड्यात होणार प्रदर्शित


Pathan Digital Rights : किंग खानच्या 'पठाण'चे डिजिटल हक्क कोट्यवधींत विकले; पुढील वर्षी सिनेमा होणार प्रदर्शित