Bhool Bhulaiyaa 2 : 'भूल भुलैया 2' चा (Bhool Bhulaiyaa 2) टायटल ट्रॅक नुकताच रिलीज झाला आहे. यात कार्तिक आर्यनने काळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे. कार्तिकच्या नृत्याने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. हे टायटल ट्रॅक नीरज श्रीधर यांनी गायले आहे. तर तनिष्क बागची आणि प्रीतम यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. 


'भूल भुलैया 2' सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. 2021 मध्ये हा सिनेमा रिलीज होणार होता. पण कोरोना प्रादुर्भावामुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा सिनेमा 20 मे 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलरने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.





'भूल भुलैया 2' सिनेमात कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'भूल भुलैया 2' हा सिनेमा 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या 'भूल भुलैया'चा रिमेक आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले आहे. सिनेमात कार्तिक आर्यन, कियारा आडवाणी, तब्बू आणि राजपाल यादव मुख्य भूमिकेत आहेत.


संबंधित बातम्या


Sarkaru Vaari Paata Trailer : 'सरकारु वारी पाटा'चा ट्रेलर रिलीज, महेश बाबू अॅक्शन मोडमध्ये


OTT Release This Week : 'थार'पासून 'झुंड'पर्यंत 'हे' सिनेमे आणि वेब सीरिज 'या' आठवड्यात होणार प्रदर्शित


Pathan Digital Rights : किंग खानच्या 'पठाण'चे डिजिटल हक्क कोट्यवधींत विकले; पुढील वर्षी सिनेमा होणार प्रदर्शित