OTT Release This Week : कोरोनाकाळानंतर प्रेक्षक ओटीटी माध्यमाकडे वळू लागले आहेत. ओटीटीवर प्रत्येक आठवड्यात अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होत असतात. या आठवड्यातदेखील अनिल कपूरच्या 'थार'पासून बिग बींच्या 'झुंड'पर्यंत अनेक सिनेमे आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत. 


बेक्ड सीझन 3 (Baked Season 3) : बेक्ड सीझन 3  (Baked Season 3) ही तीन मित्रांची कथा आहे. या सीझनमध्ये तीन मित्रांची सहल पाहायला मिळणार आहे. विश्वजॉय मुखर्जी यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. तर या सीरिजमध्ये प्रणय मनचंदा, शंतनू अनाम, माणिक पपनेजा आणि कृती विज मुख्य भूमिकेत आहेत. ही वेबसीरिज 2 मे ला वूटवर प्रदर्शित होणार आहे. 


झुंड (Jhund) : अमिताभ बच्चन यांचा 'झुंड' (Jhund) सिनेमा विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. सैराट फेम नागराज मंजुळे यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. हा सिनेमा 6 मे रोजी झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 


थार (Thar) : राज सिंह चौधरी लिखित आणि दिग्दर्शित 'थार' सिनेमात अनिल कपूर, हर्षवर्धन कपूर आणि फातिमा सना शेख प्रमुख भूमिकेत आहेत. या अॅक्शनचा तडका असलेल्या सिनेमाची निर्मिती अनिल कपूर आणि हर्षवर्धन कपूर यांनी केली आहे. हा सिनेमा ६ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.


स्टोरिज ऑन द नेक्स्ट पेज (Stories on the next Page)  : स्टोरिज ऑन द नेक्स्ट पेज या वेब सीरिजचे दिग्दर्शन बृंदा मित्रा यांनी केले आहे. या सीरिजमध्ये अभिषेक बॅनर्जी, दितिप्रिया रॉय, नमित दास, भूपेंद्र जादावत, विभा आनंद, रेणुका शहाणे, राजेश्वरी सचदेव आणि सय्यद रझा प्रमुख भूमिकेत आहेत. ही सीरिज 6 मे ला डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. 


पेट पुराण (Pet Puran) : 'पेट पुराण' ही वेबसीरिज जोडप्यांना कराव्या लागणाऱ्या संघर्षावर भाष्य करणारी आहे. या वेबसीरिजमध्ये सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत आहेत. ही वेब सीरिज प्रेक्षक 6 मे पासून सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. 


संबंधित बातम्या


Hruta Durgule : 'मन उडू उडू झालं' मालिकेतून दीपूने घेतला निरोप? हृता दुर्गुळेने एबीपी माझाला दिली माहिती


Pathan Digital Rights : किंग खानच्या 'पठाण'चे डिजिटल हक्क कोट्यवधींत विकले; पुढील वर्षी सिनेमा होणार प्रदर्शित


Unad : आदित्य सरपोतदार यांच्या ‘उनाड’ची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड; चेक प्रजासत्ताकमध्ये होणार महोत्सव