मुंबई : सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर अनेक गोष्टी समोर येत आहे. यातील एक घटना वाचून तुम्हाला धक्का बसेल. कारण, सुशांत सिंह राजपूत याने त्याच्या मित्राला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केलं होतं. मात्र, तो स्वतः मात्र वाचवू शकला नाही.


सुशांतने 2007 सालामध्ये शामक डावर यांच्याकडून नृत्य शिकल्यानंतर बॉलिवूड डान्स शिकण्यासाठी गणेश हिवरकर यांचा क्लास जॉईन केला. सुशांत आणि गणेश लवकरचं चांगले मित्र झाले. गणेशला त्याच्या क्लासमधील एक मुलगी आवडायची. मात्र, त्या मुलीने नकार दिल्याने गणेश नैराश्यात गेल्याने त्याच्या मनात आत्महत्या करण्याचे विचार येऊ लागले.

एबीपी न्यूजशी बोलताना गणेश याने सांगितले, की सुशांतला ही गोष्ट समजताच, त्याने माझ्यासोबत तासनतास वेळ घालवून मला नैराश्यातून बाहेर येण्यास मदत केली. सुशांतने मला आणि त्या मुलीला त्याच्या घरी नेऊन समजावले. गणेश पुढे म्हणाला, की सुशांत जवळपास 6 महिने मला सांभाळत होता. त्याने माझी खूप काळजी घेतली. माझ्या डान्स क्लासमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठीही त्याने माझी खूप मदत केली. त्याच्यामुळेचं माझे उत्पन्न वाढले. सुशांत मित्रांचा मित्र होता, तो आपल्या मित्रांची खूप काळजी घ्यायचा.

Sushant Singh Suicide | पाटण्याच्या एसपीना मुंबई महापालिकेने क्वॉरन्टाईन केलं

सुशांत याच्या आत्महत्येची बातमी गणेशला पहिल्यांदा समजली त्यावेळी त्याला विश्वासचं बसला नाही. सुशांत स्वतःचा जीव घेईल असा व्यक्ती नव्हता. तो एक जीवंत मनुष्य होता. आयुष्य भरभरुन जगणारा माणूस होता. तो कायम यश मिळवण्यासाठी धडपडत होता. तो नेहमी सकारात्मक विचार करत होता, अशी माहिती सुशांतचा मित्र गणेशने दिली.

पाटण्याच्या एसपीना मुंबई महापालिकेकडून क्वॉरन्टाईन
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात मुंबईत दाखल झालेल्या बिहार पोलिसांना रोज नवनव्या प्रसंगांना सामोरं जावं लागत आहे. रविवारी (2 ऑगस्ट) दुपारी मुंबईत दाखल झालेले पाटण्याचे पोलीस अधीक्षक (शहर) बिनय तिवारी यांना मुंबई महानगरपालिकेने क्वॉरन्टाईन केलं आहे. गोरेगाव येथील एसआरपीएफच्या कॅम्पमध्ये असलेल्या गेस्टरुममध्ये त्यांना क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रात्री अकराच्या सुमारास त्यांच्या हातावर स्टॅम्प मारुन त्यांना या बाबतच्या सूचना दिल्या आहेत. बिनय कुमार यांना 15 ऑगस्टपर्यंत क्वॉरन्टाईनमध्ये राहावं लागेल.

Mumbai Mayor | पाटण्याच्या एसपींचं क्वॉरंटाईन नियमानुसारच, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांचं स्पष्टीकरण