मुंबई : सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या आकड्यांपेक्षा अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या का केली? यावर सोशल मीडियावर जास्त चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातचं आता ट्विटरवरील एका फोटोने पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. या फोटोत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत एक तरुणी कारमध्ये फिरताना दिसत आहे. ही तरुणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती असल्याचा दावा करण्यात आला आहे.


अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे वडील के के सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबावर गंभीर आरोप करत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी रिया सुप्रीम कोर्टात पोहोचली आहे. रियाने स्वतःच्या बचावासाठी देशातील सर्वात मोठ्या वकिलांपैकी एक वकील अॅड. सतीश मानेशिंदे यांना हायर केलं आहे. या घडामोडी सुरू असतानाच ट्विटर वरील एका फोटोने नव्या वादाला तोंड फुटण्याची भीती व्यक्त करण्यात आले आहे.

रिया चक्रवर्तीचा नवा व्हिडीओ व्हायरल, म्हणाली, 'सत्यमेव जयते!'

काय आहे ट्विट?
जर उद्धव ठाकरे यांचा मुलगा सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्यासोबत फिरत असेल तर सुशांत सिंहच्या हत्येची सीबीआय चौकशी कशी होणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. अंकिता दवे आणि उमानंदन मिश्रा या दोघांनीही एकाच प्रकारचे ट्विट हे ट्विट केले आहे.







सत्य काय आहे?
या दोघांच्या ट्विटमध्ये दिशा पाटनीचा फोटो रिया चक्रवर्ती म्हणून फिरवला जात आहे. यांच्या ट्वीटमुळे दिशा पाटनीचा फोटो रिया चक्रवर्ती म्हणून व्हायरल होत आहे. अंकिता दवे हिच्या ट्वीटला रिप्लाय देताना अनेमकांनी हे लक्षात आणून की ती रिया नसून दिशा आहे. तरीही तिने तो ट्वीट डिलीट केलेला नाही. तर, उमानंदन मिश्राने सर्वप्रथम हा ट्वीट केलाय, त्याने अंकिता दवेच्या आधी ट्वीट केलाय, दुपारी १ वाजता. त्याने पिन ट्वीट केलाय, दोघांनीही ट्वीट डिलीट केलेला नाही. मात्र, त्यांनी रिप्लायमध्ये सांगितलंय की, हा फोटो चुकीचा असून 500 लोकांनी कॉपी केलाय. यात ब्लू टिक वालेही आहेत. म्हणजेच त्यांनी हा ट्विट जाणून बुजून केला असावा, असे लक्षात येते. मात्र, सोशल मीडियावरील वापरकर्ते कोणतीही शाहनिशा न करता हा ट्वीट व्हायरल करत आहे.


SSR suicide case | दिशा आणि सुशांतच्या आत्महत्येचा परस्परांशी संबंध? बिहार पोलिसांकडून तपास सुरु