एक्स्प्लोर

Dnyaneshwar Mauli : 'ज्ञानेश्वर माऊली' मालिकेने गाठला 500 भागांचा टप्पा; प्रेक्षक भक्तिरसात तल्लीन

Dnyaneshwar Mauli : 'ज्ञानेश्वर माऊली' या मालिकेचे आता 500 भाग पूर्ण झाले आहेत.

Dnyaneshwar Mauli : 'ज्ञानेश्वर माऊली' (Dnyaneshwar Mauli) या मालिकेने संतांची परंपरा उलगडत प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलं आहे. माऊली आणि त्यांची भावंडं, यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, सार्थ श्रीज्ञानेश्वरी, विश्वरूप दर्शन, पसायदान हे सारं काही प्रेक्षकांना विशेष भावलं. प्रेक्षक हरिभक्तीच्या या अलौकिक प्रवासाचे साक्षीदार झाले आहेत. 

'ज्ञानेश्वर माऊली' मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. या मालिकेत विविध संतांची मांदियाळी अनुभवायला मिळते आहे. आळंदीच्या ग्रामस्थांना माऊलींच्या दिव्यत्वाचे दर्शन वेळोवेळी होते आहे. माऊली आणि त्यांची भावंड यांचे चमत्कार ग्रामस्थांना पाहायला मिळाले. 

'ज्ञानेश्वर माऊली' मालिकेत  माऊली आणि त्यांची भावंडं यांच्याबरोबर संत सेना महाराज यांची भेट झाली. आत्तापर्यंत निरनिराळे संत आणि त्यांची मांदियाळी आपल्याला 'ज्ञानेश्वर माऊली' या मालिकेच्या माध्यमातून पाहायला मिळाली असून मालिका आता एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

'ज्ञानेश्वर माऊली' मालिकेचे 500 भाग पूर्ण होत आहेत. माऊलींचे चमत्कार आपल्याला यापुढेही पाहायला मिळतील. आता माऊलींच्या कार्यात ग्रामजोशी पुन्हा अडथळा निर्माण करताना दिसणार आहेत. त्यांना माऊली आणि त्यांची भावंडं कसे सामोरे जाणार, हे पाहायला मिळणार आहे. 'ज्ञानेश्वर माउली' मालिकेचे 500 भाग पूर्ण झाले असून येत्या रविवारी 9 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वा. मालिकेचा महाएपिसोड सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 

दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर निर्मित ही मालिका गेले अनेक महिने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन करते आहे. माऊलींचे चमत्कार, त्यांनी केलेलं गीता पठण यातून प्रेक्षकांना ज्ञानेश्वरांबद्दलची माहिती मिळाली. मालिकेत दाखवली गेलेली गोष्ट प्रेक्षकांना भावली आणि म्हणूनच प्रेक्षकांच्या मनात मालिकेने स्थान निर्माण केलं आहे. 

'ज्ञानेश्वर माउली' मालिकेत नंदेश उमप संत सेना महाराजांच्या भूमिकेत

संत सेना महाराज यांची भूमिका नंदेश उमप साकारत आहे. नंदेश उमप हे संगीत क्षेत्रातील नावाजलेलं व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या या वेशाची/पेहरावाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली. त्यांच्या या आध्यात्मिक भूमिकेसाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली आहे. संत सेना महाराज आणि संत ज्ञानेश्वर व त्यांची भावंडं यांची भेट कशी होते, हे पाहणे प्रेक्षकांसाठी उत्कंठा वाढवणारे असेल. 

संबंधित बातम्या

Dnyaneshwar Mauli : 'ज्ञानेश्वर माऊली' मालिकेचे 200 भाग पूर्ण; प्रेक्षक भक्तिरसात तल्लीन

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan on Hairs: सलमान खानने हेअर ट्रान्सप्लांट केलं की टक्कल? अभिनेत्याने स्वतः सांगितलं खरं कारण; म्हणाला, 'हा लूक...
सलमान खानने हेअर ट्रान्सप्लांट केलं की टक्कल? अभिनेत्याने स्वतः सांगितलं खरं कारण; म्हणाला, 'हा लूक...
Bigg Boss 20 Elimination: विकेंड का वारमध्ये सलमान खान भडकला; पहिले एलिमिनेशन पडलं पार, 'या' स्पर्धकाला दाखवण्यात आला घरचा रस्ता
विकेंड का वारमध्ये सलमान खान भडकला; पहिले एलिमिनेशन पडलं पार, 'या' स्पर्धकाला दाखवण्यात आला घरचा रस्ता
Salman Khan Bigg Boss 20 Health: सलमान खानला झालं काय? अचानक छाती धरून खाली बसला, VIDEO पाहून चाहते चिंतेत; पोस्ट शेअर करत दिली हेल्थ अपडेट
सलमान खानला झालं काय? अचानक छाती धरून खाली बसला, VIDEO पाहून चाहते चिंतेत; पोस्ट शेअर करत दिली हेल्थ अपडेट
Bigg Boss 20 Salman Khan Shirtless: कतरिना कैफच्या बॉडी शेमिंगवर सलमान खान भडकला? कॅमेऱ्यासमोर संतापला, काढले कपडे; दिलं थेट चॅलेंज
कतरिना कैफच्या बॉडी शेमिंगवर सलमान खान भडकला? कॅमेऱ्यासमोर संतापला, काढले कपडे; दिलं थेट चॅलेंज

व्हिडीओ

Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'वैभव सूर्यवंशी टीम इंडियाचं भविष्य, पण त्याला प्लेईंग 11 मध्ये..' माजी कॅप्टनकडून कौतुकाची थाप अन् प्रेमाचा सल्लाही दिला!
'वैभव सूर्यवंशी टीम इंडियाचं भविष्य, पण त्याला प्लेईंग 11 मध्ये..' माजी कॅप्टनकडून कौतुकाची थाप अन् प्रेमाचा सल्लाही दिला!
Prakash Raj on CM Vijay: थलापती विजय सीएम होऊन चार महिन्यांचा कालावधी; अभिनेते प्रकाश राज यांच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
थलापती विजय सीएम होऊन चार महिन्यांचा कालावधी; अभिनेते प्रकाश राज यांच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
Tata: टाटा ग्रुपमधील वाद कोर्टात जाणार? टाटा ट्रस्टसनं एन.चंद्रशेखरन यांची टाटा सन्समधील नियुक्ती फेटाळली, अभिषेक मनु सिंघवींवर मोठी जबाबदारी
टाटा ग्रुपमधील वाद कोर्टात जाणार, टाटा ट्रस्टसकडून सुप्रीम कोर्टातील वकिलावर मोठी जबाबदारी
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, सीबीआय संचालक ते माजी लष्करप्रमुखांना सुद्धा निवडणूक आयोगाची नोटीस, नेमकं काय घडलं?
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, सीबीआय संचालक ते माजी लष्करप्रमुखांना सुद्धा निवडणूक आयोगाची नोटीस, नेमकं काय घडलं?
वजन कमी करण्याच्या प्रयत्नात भारतीय खेळाडू बेशुद्ध पडला, थेट आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर; वडिल पीएम मोदींचे आर्थिक सल्लागार
वजन कमी करण्याच्या प्रयत्नात भारतीय खेळाडू बेशुद्ध पडला, थेट आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर; वडिल पीएम मोदींचे आर्थिक सल्लागार
आयआयटी मुंबई साहिल केस प्रकरणी प्राध्यापकाविरुद्ध FIR, साहिलला तीन महिने जातीयवादी शिवीगाळ आणि छळाला सामोरे जावे लागले, वडिलांचा गंभीर आरोप
आयआयटी मुंबई साहिल केस प्रकरणी प्राध्यापकाविरुद्ध FIR, साहिलला तीन महिने जातीयवादी शिवीगाळ आणि छळाला सामोरे जावे लागले, वडिलांचा गंभीर आरोप
भोंदू बाबाच्या लॅपटॉपमध्ये महिला आणि शाळकरी मुलींचे 50 अश्लील व्हिडिओ सापडल्याने खळबळ; छुप्या कॅमेऱ्यानं रेकॉर्ड करून डार्क वेबवर विकून बक्कळ पैसा कमावला! अशोक खरात स्टाईलने प्रसाद द्यायचा अन्..
भोंदू बाबाच्या लॅपटॉपमध्ये महिला आणि शाळकरी मुलींचे 50 अश्लील व्हिडिओ सापडल्याने खळबळ; छुप्या कॅमेऱ्यानं रेकॉर्ड करून डार्क वेबवर विकून बक्कळ पैसा कमावला! अशोक खरात स्टाईलने प्रसाद द्यायचा अन्..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2026 | रविवार
Embed widget