Nilesh Sable : "कसं काय मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे", म्हणत 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. निलेश साबळे (Nilesh Sable) घराघरांत पोहोचला. काही महिन्यांपूर्वी निलेश साबळेने 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाला रामराम केला होता. त्यानंतर काही आठवड्यांतच या बहुचर्चित कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण आता निलेश साबळे एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. एकीकडे 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने ब्रेक घेतला असता दुसरीकडे निलेश साबळे कलर्स मराठीवर 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' (Hastay Na Hasaylach Pahije) या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. डॉ. निलेश साबळे घराघरांत लोकप्रिय असला तरी त्याची पत्नी मात्र प्रकाशझोतापासून दूर आहे. निलेश साबळेची पत्नी कोण आहे? ती काय करते? हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.


प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. त्याप्रमाणे निलेश साबळेच्या मागे 'गौरी निलेश साबळे' (Gauri Nilesh Sable) आहे. निलेश साबळे अभिनेता असण्यासोबत डॉक्टर आहे. अभिनय क्षेत्रात येण्याआधी निलेशने नाशिक येथून आयुर्वेद क्षेत्रात एम.एस डिग्री मिळवली आहे. निलेशप्रमाणे त्याची पत्नी गौरीदेखील डॉक्टर आहे. निलेश आणि गौरी दोघेही एकाच महाविद्यालयात शिकायला होते. महाविद्यालयात शिकताना निलेश साबळे आणि गौरी एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे त्यांनी संसार थाटण्याचा निर्णय घेतला.


 


निलेश साबळेची पत्नी कोण आहे? (Who is Nilesh Sable Wife)


निलेश साबळेची पत्नी गौरी साबळेदेखील डॉक्टर आहे. निलेशच्या स्ट्रगलिंगच्या दिवसांत गौरी त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभी होती. गौरी साबळे पदवीधर आहे. अभिनयक्षेत्रापासून गौरी दूर आहे. पण तिला मराठी नाटक, चित्रपट, मालिका पाहायला आवडतात. सोशल मीडियावर गौरी चांगलीच सक्रीय आहे. वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींचे व्हिडीओ आणि फोटो गौरी सोशल मीडियावर शेअर करत असते. 


'अशी' आहे निलेश साबळेची लव्हस्टोरी (Nilesh Sable Lovestory)


निलेश साबळे आणि गौरी यांची चांगली मैत्री होती. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि 2011 मध्ये लग्न केलं. एका कार्यक्रमादरम्यान निलेश गौरीच्या कॉलेजमध्ये गेला होता. तिथे त्याची आणि गौरीची भेट झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं. आणि पुढे ते एकमेकांच्या प्रेमात पडले. निलेशला डॉक्टरकीमध्ये रस नसल्याचं त्याने त्यावेळीच गौरीला सांगितलं होतं.  गौरीचा यावर काही आक्षेप नव्हता. 


संबंधित बातम्या


Nilesh Sable New Comedy Show : निलेश साबळेच्या ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’चा प्रोमो आऊट; प्रेक्षक म्हणाले, 'चला हवा येऊ द्या हे आमच्यासाठी...