Jai Jai Shani Dev : छोट्या पडद्यावर वेगवेगळ्या धाटणीच्या मराठी मालिका (Marathi Serials) प्रसारित होत आहेत. आजवर पौराणिक, ऐतिहासिक, थरारक, इत्यादी मालिका पाहायला मिळाल्या आहेत. त्यातच आता नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. 'जय जय शनिदेव' (Jai Jai Shani Dev) असे या मालिकेचे नाव आहे. जीवनात सुख, शांतता आणि समाधान देणारी न्यायाची देवता 'शनिदेव' यांच्यावर आधारित ही नवी मालिका असणार आहे. या मालिकेत काय पाहायला मिळेल आणि मालिकेचे स्वरूप कसे असेल, हे अजून गुलदस्त्यात आहे. मालिकेतील कलाकार अजून उघड केलेले नसले तरी मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यावर मिळालेला प्रतिसाद आणि प्रेक्षकांचे प्रेम पाहून शनिदेव हा विषय प्रेक्षकांच्या किती जवळचा आहे, हे कळतं आहे.
शनिदेव यांच्यावर आधारित मालिका पहिल्यांदाच दूरदर्शनवर पाहता येणार आहे. सोनी मराठी वाहिनीने पहिलं पाऊल उचललं आहे. प्रेक्षकांची आतुरता आता शिगेला पोहोचली आहे. शनिदेव ही न्यायाची देवता आपल्या भक्तांच्या जीवनात सुख, शांतता आणि समाधान मिळवून देण्यासाठी मदत करते. शनिदेवांचा हा इतिहास अजून कोणीही प्रेक्षकांसमोर आणलेला नाही. लवकरच तो सोनी मराठी वाहिनीवर उलगडणार आहे. मालिकेत कोण कलाकार असतील, मालिकेचा सारांश काय असेल; हे पुढे समजेलच. त्यासाठी सोनी मराठी पाहत राहा. मालिकेबद्दलची पुढील माहिती सोनी मराठी वाहिनीवर लवकरच प्रदर्शित होईल.
'जय जय शनिदेव'चा प्रोमो आऊट! (Jai Jai Shani Dev Promo Out)
सोनी मराठी वाहिनीवर लवकरच प्रदर्शित होणारी, न्यायाची देवता 'शनिदेव' यांच्यावर आधारित नवी मालिका 'जय जय शनिदेव' आहे. नुकताच मालिकेचा प्रोमो आऊट झाला आहे. मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. 'जय जय शनिदेव' सुरू होणार असल्याने कोणती मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार हे पाहावे लागेल. मालिकेच्या प्रोमोवर चाहत्यांनी कमेंट्स करत मालिकेसाठी उत्सुक असल्याचं सांगितलं आहे. 'जय जय शनिदेव' ही मालिका कधीपासून सुरू होणार आणि किती वाजता पाहायला मिळणार हे अद्याप समोर आलेलं नाही.
शनि देवाचा शास्त्रात शनि ग्रह म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. तसेच शनिदेवाला न्यायाची देवता असंही म्हटलं जातं. शनिदेव कोणत्याही व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात, असं म्हटलं जातं. शनिदेवाची उपासना केल्याने आयुष्यात सुख, शांती येते आणि दु:ख दूर होते.
संबंधित बातम्या