Nilesh Sable New Comedy Show : 'झी मराठी'वरील 'चला हवा येऊ द्या' (Chala Hava Yeu Dya) या कॉमेडी शोमधून एक्झिट घेतल्यानंतर अभिनेता डॉ. निलेश साबळे (Nilesh Sable)आता “हसताय ना ? हसायलाच पाहिजे!!” हा नवा शो घेऊन येणार आहे. कलर्स मराठीवर हा नवा कॉमेडी शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचा प्रोमो कलर्स मराठीने आऊट केला आहे. यामध्ये निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने दिसत आहेत.
''हसताय ना ? हसायलाच पाहिजे!!' या कॉमेडी शोमध्ये लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी जबाबदारी निलेश साबळे पार पार पाडणार आहे. ‘कलर्स मराठी’ने आपल्या सोशल मीडिया हँडलवर आपल्या कॉमेडी शोचा प्रोमो पोस्ट केला आहे.
प्रेक्षक म्हणाले, आमच्यासाठी 'चला हवा येऊ द्या' म्हणजे....
''हसताय ना ? हसायलाच पाहिजे!!' या शोच्या प्रोमोवर प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका प्रेक्षकाने, एकसाथ तीन एक्के बाजी मारणार पक्के, खुप शुभेच्छा अशी प्रतिक्रिया दिली. तर, एका, आमच्यासाठी चला हवा येऊ द्या हे इमोशन आहे. तर, एकाने कोणताच कार्यक्रम आणि नवं चॅनल चला हवा येऊ द्या याला रिप्लेस करू शकणार नाही असे म्हटले. काही प्रेक्षकांनी आम्हाला बिग बॉस मराठी हवं अशी मागणी केलीय.
नव्या कॉमेडी शोमध्ये कोणते नवे कलाकार?
डॉ. निलेश साबळेबरोबरच भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे विनोदवीर शो मध्ये सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा डॉ. निलेश साबळे स्वतः सांभाळणार आहे. यात भाऊ कदम, ओंकार भोजनेबरोबरच सुपर्णा श्याम , स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण आदी कलाकारांचा समावेश आहे. 'हसताय ना ? हसायलाच पाहिजे!!' हा शो कलर्स मराठीवर 20 एप्रिलपासून शनिवार-रविवार रात्री नऊ वाजता पाहायला मिळणार आहे.
