Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेत आता नवं वळण आलं आहे. लग्न न करताच नेहा पॅलेसवर राहायला जाणार आहे. 


आजोबांच्या इच्छेखातर नेहा यशसोबत लग्न न करताच पॅलेसवर राहायला जाणार आहे. आजोबांची तब्येत ठीक नसल्याने सिम्मी काकू नेहाला आजोबांना यशसोबत लग्न केल्याचे सांगायला सांगते. त्यामुळे आता नेहा आजोबांना यशसोबत लग्न केल्याचं खोटं कारण सांगणार आहे.





मालिकेत सध्या नेहा आणि यशला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि  प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळने (Mayra Vaikul) आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.


संबंधित बातम्या


The Kashmir Files : 'चित्रपटामधून खोटा प्रचार'; शरद पवारांची 'द कश्मीर फाइल्स'वर टीका


Attack Movie : ‘या’ गोष्टींचे फॅन असाल, तर आवर्जून बघा जॉन अब्राहमचा ‘अटॅक’!


RRR Box Office Collection Day 7: पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर दिसली ‘आरआरआर’ची जादू, पाह किती गल्ला जमवला?


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha