Boss Mazi Ladachi :  'बॉस माझी लाडाची' (Boss Mazi Ladachi) मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेत्री भाग्यश्री लिमये (Bhagyashree Limaye) आणि अभिनेता आयुष संजीव ( Aayush Sanjeev) मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेत भाग्यश्री खडूस बॉसच्या भूमिकेत दिसणार आहे.


रिपोर्टनुसार भाग्यश्री लिमयेआधी तेजश्री प्रधानला 'बॉस माझी लाडाची' मालिकेसाठी विचारण्यात आले होते. पण ती काही कारणांमुळे व्यस्त असल्याने तिने ही मालिका स्वीकारली नाही. त्यामुळे निर्मात्यांनी भाग्यश्रीला या मालिकेसाठी विचारले आणि तिने होकार दिला.





"रोज नवी ठिणगी वादाची, 'बॉस माझी लाडाची'! नवी मालिका- लवकरच..' असे म्हणत मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला होता. या मालिकेचे लेखन मधुगंधा कुलकर्णी करणार आहेत. गिरीश ओक, रोहिणी हट्टंगडीसारखे नावाजलेले कलाकारदेखील मालिकेत दिसणार आहेत. 


संबंधित बातम्या


Kangana Ranaut : कंगना रनौतने आलियाच्या 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमावर साधला निशाणा


The Kashmir Files : बहुचर्चित 'द काश्मीर फाईल्स' सिनेमाचा ट्रेलर उद्या होणार प्रदर्शित


Farhan-Shibani Wedding : लग्नाआधीच फरहान-शिबानीकडे गुडन्यूज? सोशल मीडियावर चर्चांना उधाण!


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha