Farhan-Shibani Wedding : बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तर (Farhan Akhtar) वयाच्या 48व्या वर्षी पुन्हा एकदा बोहल्यावर चढला आहे. अभिनेत्री आणि होस्ट शिबानी दांडेकरसोबत (Shibani Dandekar) त्याने लग्नगाठ बांधली आहे. शिबानी-फरहान दोघेही आता पती-पत्नी बनले आहेत. 19 फेब्रुवारी रोजी खंडाळा येथील फार्महाऊसवर कुटुंब आणि काही निवडक पाहुण्यांसमोर दोघांनीही त्यांच्या नवीन नात्याला सुरुवात केली. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र, नववधूला पाहताच लोक प्रश्न उपस्थित करू लागले आणि विचारू लागले की, शिबानी दांडेकर प्रेग्नंट आहे का?


फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या लग्नाची चर्चा खूप दिवसांपासून सुरू होती. पण, अखेर 2022मध्ये त्यांनी त्यांच्या नात्याला नवीन नाव दिले. लग्नात शिबानीने लाल आणि बेज कलरचा गाऊन परिधान केला होता, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. पण या लग्नाच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधले गेले. या फोटोत लोकांना बेबी बंप दिसू लागला.


सेलिब्रिटी पापाराझी विरल भयानी यांनी या लग्नाचे काही फोटो शेअर करताच लोकांना वाटले की, या जोडीकडे लग्नाआधीच गुडन्यूज आहे. याबाबत बरेचजण केवळ अंदाज बांधत आहेत आणि सोशल मीडियावर शिबानी दांडेकर प्रेग्नंट आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


पाहा पोस्ट :



शिबानीकडे गुडन्यूज?


ब्रायडल लूकमध्ये शिबानीचे पोट पाहून सोशल मीडियावर काही गैरसमज निर्माण झाले आहेत. कारण शिबानी गर्भवती नाही. लग्नाच्या एक-दोन दिवस आधी पापाराझींनी तिला जिम बाहेर स्पॉट केले होते आणि असे काही असते, तर त्याच्याही चर्चा सुरू झाल्या असत्या.


फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर 2015 मध्ये 'आय कॅन डू दॅट' या टेलिव्हिजन शोच्या सेटवर भेटले होते. फरहान अख्तर हा शो होस्ट करत होता आणि अभिनेत्री या शोमध्ये स्पर्धक होती. या शोदरम्यान दोघांची प्रेमकहाणी सुरु झाली होती.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha