Boss Mazi Ladachi : 'बॉस माझी लाडाची'  (Boss Mazi Ladachi ) मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेत्री भाग्यश्री लिमये (Bhagyashree Limaye) आणि अभिनेता आयुष संजीव ( Aayush Sanjeev) मुख्य भूमिकेत आहेत. सोनी मराठी वाहिनीवर 'बॉस माझी लाडाची' मालिका सुरू होणार आहे. 


भाग्यश्री आणि आयुषची जोडी ही नवी जोडी या मालिकेत बघायला मिळणार आहे. भाग्यश्रीने याआधी 'घाडगे अँड सून' या मालिकेत अमृता प्रभुणे ही व्यक्तिरेखा साकारली होती. तिच्या या व्यक्तिरेखेचे प्रेक्षकांकडून खूप कौतुक झाले होते. 'बॉस माझी लाडाची' या मालिकेत ती खडूस बॉसच्या भूमिकेत दिसणार आहे.






भाग्यश्रीने सोशल मीडियावर "रोज नवी ठिणगी वादाची, 'बॉस माझी लाडाची'! नवी मालिका- लवकरच..' म्हणत मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. मधुगंधा कुलकर्णी या मालिकेचं लेखन करणार आहेत. मधुगंधाने याआधी 'जुळून येती रेशीमगाठ', 'होणार सून मी या घरची' तसेच 'सुंदरा मनामध्ये भरली' अशा लोकप्रिय मालिकांचे लेखन केले आहे. 


संबंधित बातम्या


Shahrukh khan : किंग इज बॅक! आर्यन खान प्रकरणानंतर शाहरुख खानची पहिली पोस्ट


Naagin 6 Promo : एकता कपूरच्या 'Naagin 6' चा प्रोमो रिलीज, मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला


CID Show : पुन्हा एकदा ऐकू येणार का 'कुछ तो गडबड है दया'? पाहा काय म्हणाले ACP प्रद्युम्न…


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha