CID Show Comeback : लोकप्रिय शो 'सीआयडी' (CID) अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. 'दया दरवाजा तोड दो', 'कुछ तो गडबड हैं ..'अशा लोकप्रिय संवादांसह तब्बल 21 वर्षे टीव्हीवर राज्य करणारी ही मालिका ऑक्टोबर 2018 मध्ये ऑफ एअर गेली. मात्र, आजही प्रेक्षक या शोच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, आता आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत ते ऐकून हा शो कमबॅक करण्याची तुमच्या मनातील आशाही पल्लवीत होईल. 

Continues below advertisement


लोकप्रिय टीव्ही शो सीआयडीमध्ये एसीपी प्रद्युम्नची (ACP Pradyuman) भूमिका साकारणारे अभिनेते शिवाजी साटम (Shivaji Satam) यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याकडे लक्ष वेधले आहे. त्यांच्या या मुलाखतीत त्यांनी मालिका कमबॅक करण्याचे संकेत दिले आहेत. 


आताच काही सांगता येणार नाही!


सीआयडी नव्या स्वरूपात परत येऊ शकते, असे संकेत अभिनेते शिवाजी साटम यांनी दिले आहेत. यासोबतच, त्यांनी हे देखील स्पष्ट केले आहे की, हे सर्व अद्याप अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहे, त्यामुळे याबद्दल आताच ठोस काहीही सांगता येणार नाही. मुलाखतीदरम्यान एसीपी प्रद्युम्नची भूमिका साकारणाऱ्या शिवाजी साटम यांना विचारण्यात आले की, तुम्ही पुन्हा एसीपी प्रद्युम्नची भूमिका साकारण्यास तयार आहात का? या प्रश्नाला उत्तर देताना शिवाजी साटम म्हणाले की,'जर उद्या हा शो सुरू झाला, तर सर्वप्रथम मी त्याला हो म्हणेन'.


शिवाजी साटम पुढे सांगतात की, 'एसीपी प्रद्युम्नची भूमिका साकारताना मला कधीच कंटाळा आला नाही. पण, आता घरी बसून कंटाळा आला आहे.' चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये एण्ट्री  करण्यापूर्वी शिवाजी साटम एका बँकेत कॅशियर म्हणून नोकरी देखील करत होते. मात्र, अभिनयाच्या ओढीने ते पूर्णवेळ मनोरंजन क्षेत्रात सक्रिय झाले.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha