Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरातलं (Bigg Boss Marathi New Season) वातावरण सध्या एका गोष्टीमुळे चांगलच बिघडलं आहे. निक्की आणि आर्यामध्ये झालेल्या राड्यामुळे बिग बॉसने तीव्र शब्दांत संताप व्यक्त केलाय. त्याचप्रमाणे आर्याला (Arya Jadhao) चांगलच झापलंय. कॅप्टन्सी टास्कमध्ये आर्याने निक्कीवर (Nikki Tamboli) हात उचलला आणि बिग बॉसच्या घरातल्या मुलभूत नियमांचं उल्लंघन झालं.
दरम्यान आर्याने निक्कीच्या थोबाडीत लगावल्यानंतर बिग बॉसनेही आर्याच्या हिंसेचं समर्थन केलं नाही. तसेच तिला जेलमध्ये जाण्याची शिक्षा दिली आणि या गोष्टीचा निर्णय भाऊच्या धक्क्यावर होणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता या राड्यावर रितेश भाऊ काय निर्णय घेणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
बिग बॉसने आर्याला झापलं
बिग बॉसने या घटनेवर भाष्य करताना म्हटलं की, निक्की आणि आर्यामध्ये झालेला वाद बिग बॉसने पाहिला आहे. यामध्ये बिग बॉसला असं कळालं आहे की, निक्की आक्रमक होऊन आर्याला धक्का दिला. पण आर्याने निक्कीला कानाखाली मारुन हेतूपूर्वक हिंसा केली आहे. आर्याने हे कृत्य करुन बिग बॉसच्या प्रमुख नियमाचं उल्लंघन केलं आहे. हे बिग बॉस कधीही खपवून घेणार नाही. या घटनेचा अंतिम निर्णय भाऊच्या धक्क्यावर घेतला जाईल आणि तोपर्यंत आर्या जेलमध्ये राहतील.
'आर्या अभिनंदन तमाम महाराष्ट्राची इच्छा पूर्ण केलीस'
दरम्यान, एकीकडे निक्कीवर हात उचलल्यामुळे आर्याला बिग बॉसने शिक्षा दिली आहे , तर दुसरीकडे नेटकऱ्यांचा आर्या पाठिंबा मिळताना दिसत आहे. बिग बॉस प्रेमी आर्याच्या पाठीशी उभे असल्याचं पाहायला मिळत आहे. आर्याने नियम मोडल्यामुळे तिला शिक्षा होणार असेल, तर अरबाजनेही नियम मोडलाय, त्यालाही शिक्षा व्हायला हवी, असं नेटकरी म्हणत आहेत. अरबाजनेही अभिजीतला धक्काबुक्की केली आणि जान्हवीचा हात पिरगळला.
नेमकं काय घडलं?
बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सीचा टास्क रंगला होता. त्यामध्ये घरातल्यांना मोती ताब्यात घेऊन एका सदस्याला कॅप्टन्सीच्या शर्यातीमधून बाद करायचं होतं. त्यावेळी बाथरुमध्ये निक्की आणि आर्याचा वाद सुरु असताना निक्कीने आर्याला धक्का दिला. त्यावर राग अनावर होऊन आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली.