Bigg Boss Marathi Season 5 :  बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनमध्ये (Bigg Boss Marathi new season) आतापर्यंत बरेच राडे झाले आहेत. घरात राडे घालणाऱ्या सदस्यांची रितेशने भाऊच्या धक्क्यावर चांगलीच शाळा देखील घेतली. पण घरातली एक स्पर्धक ही सुरुवातीपासूनच बरीच शांत शांत वाटतेय. योगिता चव्हाण (Yogita Chavan) ही बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसांपासून अगदी शांत होती. पण नुकत्याच पार पडलेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये मात्र योगिता चांगलीच भिडली. 


योगिताच्या या खेळानंतर तिचा नवरा आणि अभिनेता सौरभ चौघुले याने केलेली पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. सौरभने त्याच्या सोशल मीडियावर योगिताचा प्रोमो शेअर करत त्यावर दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय. त्यामुळे आता शांत शांत असणारी योगिता चांगलीच फॉर्मात आल्याचंही पाहायला मिळतंय. 


सौरभने थोपटली बायकोची पाठ


सौरभने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, फ्लॉवर समजें क्या... फायर हैं फायर असं कॅप्शन दिलं आहे. त्याचप्रमाणे वाहिनीकडून जो प्रोमो शेअर करण्यात आला आहे, त्यावर सौरभने केलेली कमेंट सध्या चर्चेत आलेली आहे. सौरभने त्यावर कमेंट करत म्हटलं की, चला आता वाट मोकळी करा. यावरुन सौरभ बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री तर नाही ना करणार अशा देखील चर्चा रंगू लागल्यात.      


योगिता आणि निक्की भिडल्या


कॅप्टन्सी टास्कसाठी टीम ए मधील सदस्य त्यांचे फ्रेंच फ्राईज वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामध्ये योगिताही तिचे फ्राईज वाचवत असते. त्यावेळी निक्की आणि तिच्यात चांगलीच हातापाई होते. 


भाऊच्या धक्क्यावर आज कुणाचा नंबर?


बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात नवीन प्रोमो समोर आला आहे. यामध्ये आजच्या भाऊच्या धक्क्याची झलक दाखवण्यात आली आहे. बिग बॉस मराठीच्या घरात झालेल्या टास्कवरुन रितेश देशमुख सदस्यांना झापणार असल्याचं यामध्ये दिसत आहे. रितेश भाऊच्या रडारवर आज कोण असणार याची उत्सुकता बिग बॉस प्रेमींना लागली आहे.






ही बातमी वाचा : 


Bigg Boss Marathi : छोट्या पाहुण्याचं आगमन ते कॅप्टन्सीच्या टास्कमधील राडा, भाऊच्या धक्क्यावर आज कुणाचा नंबर?