मुंबई : कलर्स मराठी वाहिनीवरील 'अबीर गुलाल' या मालिकेला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळत आहे. या मालिकेने अल्पावधीत चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेत निरनिराळे ट्विस्ट आणले जात आहेत. त्यामुळेच ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. मालिकेत आता एक मोठा ट्विस्ट येणार आहे. 24 वर्षांपूर्वी दोन अनोळखी मुलींचं नशीब एका रात्रीत बदललं होतं. एक नर्स या अदलाबदलीला कारणीभूत असते. पण आता हे सत्य समोर आलं आहे. गायकवाडांचं घर हेच आपलं हक्काचं घर आहे हे अखेर श्रीसमोर येणार आहे. आजच्या या विशेष भागात प्रेक्षकांना हा ट्विस्ट पाहायला मिळेल.

Continues below advertisement

श्रीसमोर येणार 'ते' सत्य

नर्समुळे गरीब घरातील शुभ्रा श्रीमंत घरात जाते तर, श्रीमंत घरातील श्री गरीब घरात लहानाची मोठी होते. पण या सगळ्याला कारणीभूत असणारी नर्स श्रीला आता तिचा हक्क आणि तिच्या खऱ्या आई-वडिलांबद्दल सांगणार आहे. मालिकेत गेल्या काही दिवसांपासून श्रीला मोठे धक्के मिळत आहेत. पण स्वत:ची खरी ओळख सांगणारा हा मोठा धक्का श्री पचवू शकेल का? हे जाणून घेण्यासाठी आजचा विशेष भाग नक्की पाहा.

दोन अनोळखी मुलींची नशीब बदलणारं

'अबीर गुलाल' मालिकेत आलेल्या सध्याच्या ट्विस्टबद्दल श्रीला वाटतंय, "मी जर माझा खरा हक्क मागितला तर गायकवाड आई, बाबा आणि घर सगळं मिळेल. पण शुभ्रा मॅडमचं अख्ख आयुष्यचं उद्धवस्त होऊन जाईल. शुभ्रा मॅडमच्या साखरपुड्यात कोणतंही विघ्न यायला नको. पण हे सगळं खरं ऐकून काही वेगळचं घडलं तर".

Continues below advertisement

'अबीर गुलाल' मालिकेचा आजचा विशेष भाग

श्री पुढे म्हणतेय, "माझ्यामुळे आधीच सगळ्यांना खूप त्रास झाला आहे. आई अंबाबाई कसली परीक्षा घेत आहेस? म्हणजे आयुष्यभर ज्यांची वाट पाहिली, ज्या गोष्टीसाठी मी तडफडत राहिले ते सगळं सुख, आनंद तू असा माझ्यासमोर मांडून ठेवला आहेस. पण हे सगळ्यांना कळल्यानंतर मला सगळे आपलं मानतील का? मला आपलं करुन शुभ्रा मॅडमला त्यांनी दूर केलं तर?". या सगळ्या प्रश्नांमध्ये गोंधळलेल्या श्रीचं पुढचं पाऊल काय असेल हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 'अबीर गुलाल' मालिकेचा विशेष भाग प्रेक्षकांना आज रात्री 8:30 वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : सूरज चव्हाणला सेलिब्रिटींचा फुल सपोर्ट, 'गुलिगत किंग'साठी जय दुधाणे, उत्कर्ष शिंदेची खास पोस्ट