Bigg Boss Marathi Season 5 :'कोकणहार्टेट गर्ल'चा हार्ट ब्रेक; बिग बॉसच्या घरात ढसाढसा रडली, निक्की तांबोळीसोबत बाचाबाची
Bigg Boss Marathi Season 5 : 'कोकण हार्टेट गर्ल' अंकिता वालावलकर आणि निक्की तांबोळीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणामुळे अंकिता दुखावल्याने तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
![Bigg Boss Marathi Season 5 :'कोकणहार्टेट गर्ल'चा हार्ट ब्रेक; बिग बॉसच्या घरात ढसाढसा रडली, निक्की तांबोळीसोबत बाचाबाची Bigg Boss Marathi Season 5 Bigg Boss Marathi New Season clash fight with Ankita Walawalkar and Nikki Tamboli Bigg Boss Marathi Season 5 :'कोकणहार्टेट गर्ल'चा हार्ट ब्रेक; बिग बॉसच्या घरात ढसाढसा रडली, निक्की तांबोळीसोबत बाचाबाची](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/31/7406eb83f8c4d48c924fdaf93b9d051f1722410795934290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्ये (Bigg Boss Marathi Season 5) घरात स्पर्धक स्थिरस्थावर होण्याआधीच आता राडा होण्यास सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि वर्षा उसगांवकर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे घरातील वातावरण तंग झाले. आता पहिल्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्कमध्ये मोठा राडा होणार आहे. 'कोकण हार्टेट गर्ल' अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) आणि निक्की तांबोळीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणामुळे अंकिता दुखावल्याने ती काही वेळ नॉमिनेशन टास्कच्या बाहेर बसली असल्याचे दिसून आले.
'बिग बॉस मराठी' सुरू होऊन चार दिवस पूर्ण झाले असून चौथ्या दिवशीच घरात पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये आजच्या दिवशी नॉमिनेशन कार्याची सुरुवात होणार आहे. प्रतिस्पर्ध्याला घराबाहेर काढण्यासाठी 'बिग बॉस'ने 'नॉमिनेशन तोफ' हा टास्क आणला आहे. प्रतिस्पर्धी स्पर्धकाला नॉमिनेट करण्यासाठी एक खेळ खेळावा लागणार आहे. या दरम्यान निक्की आणि अंकितामध्ये जोरदार वादावादी झाली.
स्पर्धकांना एका चौकानाभोवती उभे राहायचे असते आणि खेळ पूर्ण करायचा असतो. अंकिताच्या समोर निक्की येऊन उभी राहते. त्यावेळी अंकिता तिला हटकते. अंकिता निक्कीला उचलते आणि तुला असे बाजूला करू का असे विचारते. यावर निक्की माझा हात कसा चालतो हे दाखवू असे म्हणते. त्यानंतरही शाब्दिक बाचाबाची होत असते. अंकिता निक्कीला वैतागून दुसऱ्या जागी उभी राहते. पण, निक्कीदेखील तिथेचे येते. हे पाहून अंकिता पुन्हा जागा बदलते. त्याचवेळी पु्न्हा मला हात लावला तर तुझे तोंड खलबत्यात ठेचेल अशी धमकी देते. निक्कीकडून होणारी कोंडी पाहता अंकिता गेमच्या बाहेर जाते आणि सोफ्यावर बसून रडते.
View this post on Instagram
कोकण हार्टेड गर्ल अंकितावर निक्कीने आधीच नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता नॉमिनेशन टास्कमध्ये आता अंकिता आणि निक्कीमध्ये कडाक्याची भांडण झाले आहे. आजच्या नॉमिनेशन टास्कमध्ये कोण नॉमिनेशनच्या चक्रात अडकणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. राड्यादरम्यान हे दोन सदस्य टास्क कसा पूर्ण करणार हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)