Bigg Boss Marathi : स्ट्रॅटर्जी त्यांच्यासोबत करता आणि आमच्यावर विश्वासाचं बोलणार? पॅडीदादांनी वर्षाताईंना थेट सुनावलं
Bigg Boss Marathi Season 5 : कॅप्टन होण्यासाठी धनंजय, सूरज, वर्षा आणि अरबाज हे दावेदार असल्याचं दिसत आहे. आजच्या भागाचा प्रोमो समोर आला आहे.
![Bigg Boss Marathi : स्ट्रॅटर्जी त्यांच्यासोबत करता आणि आमच्यावर विश्वासाचं बोलणार? पॅडीदादांनी वर्षाताईंना थेट सुनावलं Bigg Boss Marathi Paddy Kamble Angry on Varsha Usgaonkar Captaincy Task marathi news Bigg Boss Marathi : स्ट्रॅटर्जी त्यांच्यासोबत करता आणि आमच्यावर विश्वासाचं बोलणार? पॅडीदादांनी वर्षाताईंना थेट सुनावलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/20/0332065f213319cfaaea980d375bf89b1726813062636322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bigg Boss Marathi Latest Episode : बिग बॉस मराठीच्या घरात सध्या कॅप्टन्सी टास्क पार पडताना दिसत आहे. कॅप्टन्सी कार्यात जोरदार राडा पाहायला मिळत आहे. आजच्या भागात कॅप्टन होण्यासाठीचा टास्क पाहायला मिळणार आहे. कॅप्टन होण्यासाठी धनंजय, सूरज, वर्षा आणि अरबाज हे दावेदार असल्याचं दिसत आहे. आजच्या भागाचा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये या चौघांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे.
कोण होणार नवा कॅप्टन?
बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) नवीन प्रोमोमध्ये चार दावेदारांमध्ये कॅप्टन होण्याची स्पर्धा दिसत आहे. आज कॅप्टन्सी टास्कमध्ये कोणाचं गोड पाणी, कोणाची तहान भागवणार, हे पाहावं लागणार आहे. यामध्ये सूरज, वर्षा ताई आणि अरबाज यांना दुसऱ्यांदा कॅप्टन होण्याची संधी चालून आली आहे, तर धनंजय पहिल्यांदा कॅप्टन होण्याच्या शर्यतीत कायम राहिला आहे.
घरात कॅप्टन्सीचा टास्क
कॅप्टन पदाच्या उमेदवाराच्या भांड्यातील पाणी पिण्याचा टास्क असल्याचं दिसून येत आहे. कॅप्टन्सी टास्कमध्ये वर्षा घरातील सदस्यांना म्हणतेय आपली तहान भागवा. अरबाज म्हणतो, हे खूप गोड पाणी आहे. त्यावर निक्की म्हणते, कालपर्यंत तुझ्यामध्ये एवढा कडूपणा होता, अचानक तुझं पाणी इतकं गोड कसं झालं? तर, पॅडी वर्षाताईंना म्हणतो, तुम्हाला वाटलं होतं का ताई आम्ही पाणी पिऊ. यावर वर्षाताई म्हणतात, हो मला वाटलं होतं. मग, पॅडी म्हणतो की, स्टॅटर्जी करायला तुम्ही त्यांच्यासोबत आणि आमच्यावर विश्वासाबद्दल बोलताय.
पॅडीदादांनी वर्षाताईंना थेट सुनावलं
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Bigg Boss Marathi : संग्राम भाऊ, पार इज्जत घालवली! फुसका बार निघाला; अरबाजसोबत डील केल्याने प्रेक्षक भडकले
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)