Bigg Boss Marathi Latest Episode : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले जवळ आला आहे. लवकरच बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता मिळणार आहे. बिग बॉस मराठीमध्ये कुटुंबियांची भेट घडवण्यात आली आहे. बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्यांची घरची मंडळी त्यांना भेटायला आली होती. यावेळी सर्व सदस्य खूप इमोशनल झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी निक्कीची आई आणि बाबाही घरात आले होते. त्यांनी निक्कीला रागावर कंट्रोल ठेवायला सांगितला. यासोबतच निक्कीच्या आईने अरबाजबाबत धक्कादायक खुलासाही केला.
निक्कीच्या आईचा बिग बॉसच्या घरात मोठा खुलासा
बिग बॉसच्या घरात निक्कीच्या आईने मोठा खुलासा करताना तिला सांगितलं की, अरबाजचा आधीच साखरपुडा झालाय. त्याच्या रिलेशनशिपची खूप चर्चा आहे, वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. त्याच्या आईने म्हटलंय की, दोन शोनंतर आधीच त्याच्या मागे दोन मुली पडल्या आहेत. आता ही तिसरी आहे. मी सगळ्यांना घरात नाही घेऊ शकत. निक्कीच्या आईने अरबाजबद्दल असं सांगताच निक्कीला मोठा धक्का बसला. यानंतर निक्कीने तिच्याजवळ असलेले अरबाजच्या वस्तू आणि कपडे स्टोअर रुममध्ये ठेवले. निक्की पुढे म्हणाली की, अरबाज आणि निक्की हा विषय आता संपलाय.
साखरपुड्याच्या चर्चांवर अरबाजची प्रतिक्रिया
बिग बॉसच्या घरातील हा प्रकार पाहता अरबाज पटेलने यावर प्रतिक्रिया दिली आहे. अरबाज म्हणाला की, "निक्कीची आई घरात तिला सांगत आहे की, माझा साखरपुडा झाला आहे. मला एवढंच सांगायचंय की, माझा साखरपुडा आणि लग्न यातलं काहीच झालं नाहीय. या सगळ्या फक्त अफवा आहेत, मी खरं बोलतोय. निक्कीचं चिडणं स्वाभाविक आहे, कारण तिला बाहेर काय घडतंय, हे माहित नाही. नंतर आम्ही भेटल्यावर मी तिला सगळं सांगेन". राजश्री मराठीशी बोलताना अरबाजने ही प्रतिक्रिया दिली आहे.
निक्कीच्या आईचा अरबाजबद्दल धक्कादायक खुलासा
महत्त्वाच्या इतर बातम्या :