Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


'तारक मेहता...' फेम सोनूच्या अडचणीत वाढ, निर्मात्यांनी पाठवली कायदेशीर नोटीस; नुकसानीची भरपाई देण्याची मागणी


TMKOC Sent Notice To Palak Sindhwani : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील निर्माते आणि कलाकार याच्यात गेल्या काही काळापासून अनेक वाद समोर आले आहेत. तारक मेहता फेम गुरुचरण सिंह उर्फ सोढी याने मालिकेतून हाकलल्याचा आरोप निर्मात्यांवर केला होता. सोढीची पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री हिलाही अशाच प्रकारे शोमधून बाहेर काढण्यात आल्या त्याने सांगितलं होतं. आता आणखी एका कलाकारासोबत निर्मात्यांचा वाद समोर आला आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेच्या निर्मात्यांनी सोनू उर्फ पलक सिंधवानी हिच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. तिला नोटीस पाठवत नुकसान भरपाईची मागणीही करण्यात आली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...


OTT Release : 'या' आठवड्यात मनोरंजनाचा फुल्ल तडका, ओटीटीवर रिलीज होणार ॲक्शन-थ्रिलर चित्रपट


New OTT Release : सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या वीकेंड वर लक्ष ठेवणाऱ्यांना ओटीटीवरील या सिरीज आणि ॲक्शन चित्रपटांची यादी आम्ही घेऊन आलो आहोत. या महिन्याचा शेवटचा आठवडा ॲक्शन आणि थ्रिलर चित्रपटांसह वेब सिरीज पाहण्यासाठी पॉवरपॅक ठरणार आहे. या आठवड्यात हॉटस्टार, नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईमसह जिओ सिनेमा अशा सर्वच ठिकाणी अनेक नव्या वेब सिरीज आणि चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. काही थ्रिलर चित्रपटांसह वेब सिरीज रिलीज सध्या ट्रेंडिंग असून ॲक्शन चित्रपट ही सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...


Beerbiceps YouTube Hacked : यूट्यूबर रणवीर अलाहबादियाचे दोन यूट्यूब चॅनेल हॅक, सर्व व्हिडीओ आणि कंटेंट डिलीट; कोट्यवधींचं नुकसान


Ranveer Allahbadia Youtube Channel Hacked : प्रसिद्ध रणवीर अल्लाबदिया सायबर हल्याच्या बळी ठरला आहे. हॅकर्सनी त्याचे यूट्यूब चॅनल बीअर बायसेप्स (Ranveer Allahbadia Beerbiceps) हॅक केल्याची माहिती आहे. हॅकर्सने रणवीरचे दोन यूट्यूब चॅनेल्स हॅक केले आहेत. इतकंच नाही तर हॅकर्स त्याच्या चॅनलवरील सर्व कंटेंट डिलीट केला आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...


Mumbai Crime News : बांगलादेशी अडल्ड स्टारचं भारतात अवैधरीत्या वास्तव्य, उल्हासनगरमधून बांगलादेशी कुटुंबाला अटक


Bangladeshi Illegal Immigrants : भारतात अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या उल्हासनगरमधून पोलिसांनी एका बांगलादेशी अभिनेत्राला अटक केली आहे. ही अभिनेत्री अडल्डस्टार असल्याचंही सांगितलं जात आहे. या अडल्ड स्टारचं अख्खं कुटुंबच बनावट कागदपत्रांच्या आधारे  भारतात वास्तव्यास असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. उल्हासनगरमध्ये ही तरुणी रिया बर्डे उर्फ आरोही बर्डे या मराठी नावाने राहात होती. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...


प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी 10 लाख रुपयांची चोरी, नोकरानेच केला हात साफ


Mohan Babu House Robbery : प्रसिद्ध अभिनेता मोहन बाबू यांच्या घरी 10 लाख रुपयांची चोरी झाल्याची मोठी माहिती समोर येत आहे. मोहनबाबू यांच्या घरातून 10 लाख रुपयांची रोख रक्कम चोरीला गेली होती. अभिनेता मोहन बाबू यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकार आहेत. त्यांनी सुमारे 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याप्रकरणात मोहन बाबू यांच्या घरातील नोकरच आरोपी असल्याचं समोर आळं आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...