Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांत 'फ्रेंड टू फ्रेंड' चर्चा; यशश्रीला समृद्धी देणार मोलाचा सल्ला
Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात समृद्धी यशश्रीला सल्ले देताना दिसणार आहे.
Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi 4) घरात दररोज नव-नवीन ट्विस्ट येत आहेत. घरातील सदस्यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. घरातील सदस्यांना आपण कुठे चुकतं आहोत, आपण रागाच्या भरात काय बोलून गेलो हे कळत नाही. त्यामुळेच अनेक गैरसमज होता. पण प्रेक्षकांचं मात्र मनोरंजन होत आहे.
आजच्या भागात समृद्धी यशश्रीसोबत 'फ्रेंड टू फ्रेंड' चर्चा करताना दिसणार आहे. समृद्धी यशश्रीला सांगताना दिसणार आहे की,"मला एक गोष्ट सांगायची आहे, मला तुझ्या
धैर्याचा कौतुक वाटतं. हे सगळे तुझ्याविरुद्ध असले तरीदेखील".
समृद्धी पुढे म्हणते,"पुढे जेव्हा तुला स्ट्रॉंग सपोर्ट लागेल ना तेव्हा लोक दोन तीन वेळा विचार करतील. मला माहिती आहे तुला असं वाटतं की कोणी तुझं ऐकत नाही. पण मी तुझा विचार करते. पण त्याचवेळी तुझ्या मनमौजी वागण्याचा त्रास होतो". यावर यशश्री म्हणते,"समृद्धी ज्यांना माझ्याविषयी विश्वास वाटायला पाहिजे त्यांना मी दाखवून दिले आहे." समृद्धीने दिलेला सल्ला यशश्रीला पटला का? हे आजच्या भागात कळणार आहे.
'बिग बॉस'च्या घरात पार पडलं 'फटा पोश्टर निकाला झिरो' नॉमिनेशन कार्य
बिग बॉसच्या घरात नुकतच 'फटा पोश्टर निकाला झिरो' हे नॉमिनेशन कार्य पार पडलं आहे. सदस्य या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणाला नॉमिनेट करणार? आणि कोणाला सेफ? कोण घराबाहेर जाईल? याची प्रेक्षकांना उत्सुकता होती.
View this post on Instagram
यशश्रीने अमृता देशमुखला नॉमिनेट केल्यामुळे दोघींमध्ये कडाक्याचे भांडण झालेले दिसून आले. अमृताचे म्हणणे आहे,"स्वतः काहीतरी विक्षिप्तासारखं वागायचं, या लोकांच्या जीवावर उड्या मारते आहेस ना? यशश्रीने त्यावर उत्तर दिले,"मला तुझ्यासमोर स्वत:ला सिद्ध करण्याची गरज नाही, मी कोणाच्या जीवावर उड्या मारत नाही".
संबंधित बातम्या