Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. 'बिग बॉस 17'च्या घरात अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) अनेकदा सुशांत सिंह राजपूतबद्दल (Sushant Singh Rajput) भाष्य करताना दिसत आहे.


'बिग बॉस 17' हा कार्यक्रम सुरू होऊन 10 आठवडे पूर्ण झाले आहेत. पहिल्या दिवसापासूनच हा कार्यक्रम चर्चेत आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) पती विकी जैनसोबत (Vicky Jain) 'बिग बॉस 17' या कार्यक्रमात सहभागी झाली आहे. अंकिता आणि विकी दोघेही 'बिग बॉस 17'मधील स्ट्रॉन्ग स्पर्धक आहेत. दोघांच्या भांडणांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या कार्यक्रमात ती पती विकी जैनसोबत सहभागी झाली असली तरी एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूतबद्दल भाष्य करताना ती दिसून येते. 


अंकिता लोखंडे पुन्हा एकदा सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत


अंकिता लोखंडेला पुन्हा एकदा सुशांत सिंह राजपूतची आठवण आली आहे. सिनेमांत सुशांतला इतर कोणासोबत रोमान्स करताना पाहिल्यानंतर अंकिताला अश्रू अनावर होत होते. 'बिग बॉस 17'च्या नुकत्याच पार पडलेल्या भागात अभिषेक सिंह, आयशा खान, अनुराग डोभाल आणि अंकिता लोखंडे गप्पा मारताना दिसत आहेत. अभिषेक म्हणतो,"उडानियां'च्या सेटवर ईशा मालवीयचं लग्न होत होतं तेव्हा मला वेड लागलं होतं. त्यावेळी मी सर्वांसोबत भांडलो होतो". 




अभिषेकच्या बोलण्यानंतर अंकिता म्हणते,"माझ्यासोबतदेखील असं घडलं आहे. 'शुद्ध देशी रोमान्स' रिलीज झाला तेव्हा सुशांतने माझ्यासाठी अख्खं थिएटर बूक केलं होतं. सुशांतचे रोमँटिक सीन पाहिल्यानंतर मला राग येईल हे त्याला माहिती होतं. त्यावेळी त्याला इतर कोणासोबत रोमान्स करताना पाहून मला अश्रू अनावर झाले होते". 


अंकिता पुढे म्हणते,"सुशांतला इतर कोणासोबत रोमान्स करताना मला पाहावत नव्हतं. सिनेमानंतर आम्ही घरी गेलो. घरी गेल्यानंतर मला पाहून सुशांतही रडू लागला. सुशांत म्हणाला,"मला माफ कर गूगू... पुन्हा असं नाही करणार". विकीदेखील माझे रोमँटिक सीन कधीच पाहू शकत नाही". 


संबंधित बातम्या


Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17'च्या घरात अंकिता लोखंडेवर धावून गेला विकी जैन; नेटकऱ्यांनी घेतली शाळा