Bigg Boss 17 Vicky Jain Tries to Slap Ankita Lokhande : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) या कार्यक्रमात अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) पती विकी जैनसोबत (Vicky Jain) सहभागी झाली आहे. हे दोन्ही स्पर्धक सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. आता या कार्यक्रमात विकी थेट अंकिताला मारताना दिसून आला आहे.


'बिग बॉस 17'मध्ये एन्ट्री करण्याआधी अंकिता लोखंडे आणि विकी जैन सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह होते. पण 'बिग बॉस'च्या घरात मात्र सतत ते एकमेकांसोबत वाद घालताना दिसत आहेत. या कार्यक्रमातील सर्वच स्पर्धक एकमेकांसोबत मोठ्या प्रमाणात भांडताना दिसून येत आहेत. 


विकी जैन अंकिता लोखंडेवर गेला धावून


'बिग बॉस 17'च्या नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये अंकिता लोखंडे, विकी जैन, अभिषेक कुमार आणि अरुण माशेट्टी यांच्या जोरदार वाद झालेला पाहायला मिळाला. अभिषेक कुमार विकीसोबत एका विषयावर वाद घालताना दिसून येतो. दरम्यान त्यांच्या भांडणात अंकिताची एन्ट्री होते. त्यानंतर विकी जैन अंकिता लोखंडेवर धावून जातो आणि तिला शांत राहायला सांगतो. 






विकी जैन नेटकऱ्यांकडून ट्रोल


विकी जैन अंकिता लोखंडेवर धावून जातानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी विकी जैनला ट्रोल करत आहेत. विकी जैन अंकिता लोखंडेवर धावून गेला हे प्रचंड वाईट आहे. विकी जैन त्याच्या पत्नीची किंमत करत नाही. नॅशनल टीव्हीवर पत्नीसोबत असं वागत असेल तर घरी कसा वागत असेल, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 


'बिग बॉस 17'च्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैन अनेकदा भांडताना दिसून येतात. काही दिवसांपूर्वी आयशासोबत बोलताना अंकिता म्हणाली की,"विकीचं माझ्यावर प्रेम आहे हे मला माहिती आहे. पण मला काय हवं या गोष्टीचा विकी कधी विचार करत नाही. बिग बॉसच्या घरात मी कधी कोणत्या पुरुष स्पर्धकासोबत भांडते तेव्हा विकी मला थांबवण्याचा प्रयत्न करतो". अंकिता लोखंडे 2021 मध्ये उद्योगपती विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकली. डिसेंबर 2021 मध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. 


संबंधित बातम्या


Bigg Boss 17: अंकिता लोखंडे आणि विकी जैनचा घटस्फोट होणार? बिग बॉसच्या घरात दोघांमध्ये तू-तू मैं-मैं