Gautami Deshpande And Swanand Tendulkar Wedding: अभिनेत्री गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) आणि स्वानंद तेंडुलकर (Swanand Tendulkar) यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला आहे. गौतमी आणि स्वानंद यांच्या विवाह सोहळ्याला त्यांच्या जवळच्या मित्रमैत्रिणींनी आणि कुटुंबानी हजेरी लावली होती. गौतमी आणि स्वानंदने त्यांच्या विवाह सोहळ्यासाठी खास लूक देखील केला होता.


गौतमी आणि स्वानंदचा खास लूक


गुलाबी रंगाची साडी, नाकात नथ  आणि  गोल्ड ज्वेलरी असा लूक गौतमीनं विवाह सोहळ्यासाठी केला होता. तर स्वानंदनं गुलाबी रंगाचा आऊटफिट परिधान केला होता. दोघांच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले.






गौतमी आणि स्वानंद यांनी त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "Did I hear beautiful? To the Beginnings" गौतमी आणि स्वानंद यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये गौतमीची बहीण मृण्मयी देशपांडे ही स्वानंदचे कान पिळताना दिसत आहे. गौतमी आणि स्वानंद यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या त्यांच्या लग्नसोहळ्याच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. गौतमी आणि स्वानंद यांचा हळद आणि मेहंदी सोहळ्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.






माझा होशील ना या मालिकेमुळे गौतमीला विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेत गौतमीनं सई ही भूमिका साकारली. सारे तुझ्याचसाठी, माझा होशील ना या मालिकांमध्ये देखील गौतमीनं काम केलं आहे.गौतमीला गायनाची देखील आवड आहे. विविध गाण्यांचे व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.  तिला इन्स्टाग्रामवर  440K फॉलोवर्स आहेत.


स्वानंद हा डिजिटल क्रिएटर आहे. तो भाडीपा या युट्यूब चॅनलमध्ये काम करतो. स्वानंद हा सोशल मीडियावर अॅक्टिव असतो. तो विविध रिल्स इन्स्टाग्रामवर शेअर करतो.


इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Gautami Deshpande: "तुझ्याकडे गाडी नाहीये का? सारखं रिक्षातून फिरत असतेस. तुझी बहीण बघ..", नेटकऱ्याचा प्रश्न; गौतमी देशपांडेनं दिलं भन्नाट उत्तर