एक्स्प्लोर

Bigg Boss 16 : पार पडलं ‘बिग बॉस 16’चं पहिलं एलिमिनेशन; अभिनेत्री श्रीजिता डे बिग बॉसच्या घराबाहेर!

Bigg Boss 16 : स्पर्धक-अभिनेत्री श्रीजिता (Sreejita De) ‘बिग बॉस 16’च्या घरातून बाहेर गेली आहे.

Bigg Boss 16 : टीव्ही विश्वातील सर्वात वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) सुरुवातीपासूनच खूप चर्चेत आहे. शोच्या नव्या सीझनमध्ये प्रेक्षकांना सुरुवातीपासूनच नवे धमाके पाहायला मिळत आहेत. यातच शनिवारी प्रसारित झालेल्या ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये पुन्हा एकदा मनोरंजनाचा डबल डोस पाहायला मिळाला. एकीकडे सलमान खानने शालीन भानोतची जोरदार शाळा घेतली, तर दुसरीकडे या सीझनमधून घरातून बाहेर पडलेल्या पहिल्या सदस्याचे नावही जाहीर करण्यात आले. स्पर्धक-अभिनेत्री श्रीजिता (Sreejita De) ‘बिग बॉस 16’च्या घरातून बाहेर गेली आहे.

नेहमीप्रमाणेच यावेळेसही वीकेंडच्या एपिसोडमध्ये अनेक धमाके आणि गोंधळ पाहायला मिळाला. सलमान खानने गेल्या आठवड्यात घरातील सततच्या उद्धटपणामुळे चर्चेत असलेल्या शालीनला चांगलेच फटकारले, तर शोमध्ये पाहुणे म्हणून आलेल्या सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रकुल प्रीत यांनीही कुटुंबातील सदस्यांसह खूप धमाल केली. या एपिसोडच्या शेवटी एलिमिनेट झालेल्या सदस्याचे नाव जाहीर करण्यात आले, जे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला.

पाच स्पर्धक झाले होते नॉमिनेट

‘बिग बॉस 16’च्या घरात गेल्या आठवड्यात अनेकांना नॉमिनेट करण्यात आले होते. गोरी नागोरी, एमसी स्टेन, शालिन भानोत, टीना दत्ता आणि श्रीजिता डे यांच्यासह अनेकांना गेल्या आठवड्यात नॉमिनेट करण्यात आले होते. यापूर्वी अनेक टास्क झाले, ज्यात या पाच जणांना नॉमिनेट करण्यात आले. यावेळी गोरी नागोरी आणि श्रीजिता यांच्यात चांगलीच कॅट फाईट पाहायला मिळाली. शालीनला ‘बिग बॉस’मध्ये नॉमिनेट केले गेले ते त्याच्या कृत्यांमुळे, तर टीना, श्रीजिता, एमसी स्टॅन आणि गोरी यांना घरातील हंगाम्यामुळे गौतमने नॉमिनेट केले. याचवेळी सलमान खानने बिग बॉसच्या पहिल्या एलिमिनेशनची घोषणा केली.

श्रीजिताच्या बाहेर जाण्याने सगळ्यांनाच बसला धक्का

'बिग बॉस 16' च्या कालच्या एपिसोडमध्ये म्हणजेच ‘शनिवार वीकेंड के वार’मध्ये सलमान खानने एलीमिनेट सदस्याचे नाव जाहीर केले. यावेळी त्याने श्रीजिता डेचे नाव घेतले. ‘बिग बॉस’च्या घरातील सर्वात मजबूत स्पर्धकांपैकी एक असलेल्या श्रीजिता डेचे नाव जेव्हा सलमानने इव्हिक्शनसाठी घेतले, तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. मात्र, यापूर्वी गोरीसोबत झालेल्या भांडणामुळे श्रीजिता डेला प्रेक्षकांची कमी मते मिळाली होती आणि त्यामुळेच ती बेघर झाली आहे. यानंतर सलमानने तिला शुभेच्छा देऊन या घरातून निरोप दिला.

वाईल्ड कार्ड म्हणून पुन्हा एन्ट्री घेणार?

‘बिग बॉस’च्या घरातील श्रीजिता डेचा प्रवास संपला आहे. या एलिमिनेशनमुळे प्रेक्षकही थोडे निराश झाले आहेत आणि स्वत: श्रीजिता देखील या एलिमिनेशनशी सहमत नाही. ‘बिग बॉस 16’मध्ये तिला आणखी एक संधी दिली जाईल, असा विश्वास श्रीजिताला आहे. श्रीजिताने सांगितले की, तिला बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून बोलावले जाऊ शकते.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Bigg Boss 16: ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खान बरसणार; शालीन भानोतला फटकारणार तर, ‘या’ स्पर्धकांचं होणार कौतुक!

महत्त्वाच्या बातम्या

Subodh Bhave On Sai Tamhankar: 'सई ताम्हणकर इंडस्ट्रीत कितपत टिकेल, याबाबत मला शंका...'; सुबोध भावेनं स्पष्टीकरणासह दिलं कारण, नेमकं काय म्हणाला?
'सई ताम्हणकर इंडस्ट्रीत कितपत टिकेल, याबाबत मला शंका...'; सुबोध भावेनं स्पष्टीकरणासह दिलं कारण, नेमकं काय म्हणाला?
Kushal Badrike On Female Character In Chala Hawa Yeu Dya: 'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; 'चला हवा येऊ द्या'बाबत नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
Amol Kolhe On Savitribai Jyotiba Phule Serial: TV वरुन गाशा गुंडाळला, पण युट्यूबर येताच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं; 'सावित्रीबाई जोतीराव फुले'बाबत अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
'टीआरपीपेक्षा प्रेक्षकांचं प्रेम महत्त्वाचं...'; 'सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेबाबत अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
Kushal Badrike On Marathi Movie Show In Theaters: आज आमच्या आई-बापावर आलंय, आता आम्ही शांत बसू शकत नाही, कुशल बद्रिके हळहळला
आज आमच्या आई-बापावर आलंय, आता आम्ही शांत बसू शकत नाही; कुशल बद्रिके हळहळला

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
Embed widget