एक्स्प्लोर

Bigg Boss 16 : घराच्या नियमांचे उल्लंघन, ‘बिग बॉस’ने निमरितकडून हिसकावले कॅप्टनपद!

Bigg Boss 16 : छोट्या पडद्यावरचा बहुचर्चित आणि वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ (Bigg Boss 16) नवीन सीझन सुरू होताच प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळत आहे.

Bigg Boss 16 : छोट्या पडद्यावरचा बहुचर्चित आणि वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ (Bigg Boss 16) नवीन सीझन सुरू होताच प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळत आहे. ‘बिग बॉस 16’ हा शो सुरू होऊन आता एक आठवडा उलटून गेला आहे. मात्र, दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच बिग बॉसच्या घरात चांगलाच गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. सोमवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये अर्चना आणि शालीन यांच्यात जेवणावरून झालेल्या वादापासून ते निमरितकडून कर्णधारपद हिसकावण्यापर्यंत असे अनेक जोरदार धमाके पाहायला मिळाले.

दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या एपिसोडच्या सुरुवातीला अर्चना आणि शालीनमध्ये चिकनवरून खूप वाद झाला होता. एकीकडे शालीन आपल्या वैद्यकीय स्थितीचा हवाला देत ‘चिकन’वर आपला हक्क सांगताना दिसला होता, तर अर्चनानेही त्याला संपूर्ण चिकन देण्यास थेट नकार दिला. दोघांमधील वाद इतका वाढला होता की, शालीनने अर्चनाला उद्देशून काही अपशब्द देखील काढले. यानंतर अर्चनाने रागाच्या भरात शालीनला शिवीगाळ केली होती. मात्र, घरातील इतर स्पर्धकांनी या वादात उडी घेत दोघांमधील वाद मिटवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

.. म्हणून निमरित कौर अहलुवालियाची कॅप्टन पदावरून हकालपट्टी!

घरातील वातावरण पाहून बिग बॉसने सर्व सदस्यांसाठी वेकअप अलार्म वाजवला. इतकंच नाही तर, त्यांनी स्पर्धाकांना त्यांच्या वागणुकीबद्दल खडसावले. ‘बिग बॉस’ने घरात झालेल्या गोंधळ आणि अराजकतेवरून सर्वांना चांगलेच खडे बोल सुनावले. यासोबतच बिग बॉसने वारंवार घरातील नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे निमरित कौर अहलुवालियाकडून घराची कॅप्टन्सीही हिसकावून घेतली. निमरितला कॅप्टन पदावरून बाद केल्यानंतर घराचा नवा कॅप्टन होण्यासाठी शिव आणि गौतममध्ये टास्कही आयोजित करण्यात आला होता.

‘हा’ स्पर्धक ठरला नवा कॅप्टन

कॅप्टन बनण्याच्या टास्कचा एक भाग म्हणून शिव आणि गौतम डोक्यावर टब घेऊन उभे राहिले. त्याचवेळी कुटुंबातील सदस्य त्या टबचा भार वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. यादरम्यान घरातील सदस्यांमध्ये पुन्हा एकदा जोरदार भांडण झाले. तर, टास्कदरम्यान शालीनने पुन्हा अर्चनाला धक्काबुक्की केल्यामुळे घरात बराच वाद झाला. त्यानंतर मात्र बिग बॉसने याप्रकरणी कठोर पाऊल उचलले आणि शालीनला शिक्षा सुनावली. तर, कॅप्टनसीसाठी टास्कमध्ये फसवणूक केल्याबद्दल शिव या शर्यतीत अपात्र ठरला, त्यानंतर गौतमला घराचा नवीन ‘कॅप्टन’ म्हणून निवडण्यात आले. त्यामुळे आता घराच्या नेतृत्वाची धुरा आता गौतमच्या हातात देण्यात आली आहे.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Bigg Boss 16 : सलमान खानने घरातील स्पर्धकांना दिली पार्टी; मान्या-श्रीजितामध्ये जोरदार भांडण

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe Marathi News: Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
By Poll Election: विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
Bankipur By-election Prashant Kishor: पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
Nashik Potholes: 'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe Marathi News: Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
By Poll Election: विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
Bankipur By-election Prashant Kishor: पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
Nashik Potholes: 'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
Abhijeet Dipke on PM Modi: आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
Sanjay Raut: 'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
Embed widget