Bigg Boss 15 : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनबाधितांमध्येही वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांत बॉलिवूड मनोरंजन सृष्टीतील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. आता प्रेक्षकांना न दिसणाऱ्या बिग बॉसलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. म्हणजेच बिग बॉसचा आवाज देणाऱ्या अतुल कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. 


बिग बॉसच्या घरात कोरोनाचा शिरकाव 
बिग बॉसचा आवाज असणाऱ्या अतुल कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बिग बॉसच्या सेटवरील सर्व व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. त्यामुळे सध्या सेटवरील प्रत्येकाचा रिपोर्ट येण्याची वाट पाहिली जात आहे. 


दोन आठवडे शो वाढवण्याचा निर्णय
शोचा एक नवीन प्रोमो चॅनलने शेअर केला आहे, ज्यामध्ये सलमान खान शो दोन आठवड्यांनी वाढवल्याची घोषणा करताना दिसत आहे. सलमानची ही घोषणा ऐकल्यानंतर प्रत्येक स्पर्धकाची प्रतिक्रिया खूप वेगळी होती. प्रोमोमध्ये शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सर्व स्पर्धक लिव्हिंग एरियामध्ये बसलेले दिसत आहेत आणि बिग बॉस त्यांना सांगतात की फिनालेचे तिकीट जिंकण्याची लढाई अद्याप संपलेली नाही. त्यानंतर सलमान खान स्पर्धकांना एक आनंदाची बातमी असल्याचे सांगतो की, हा शो दोन आठवडे वाढवला जात आहे. हे ऐकल्यानंतर राखी सावंत आनंदाने ओरडू लागते, तर निशांत आणि शमिता शेट्टीला धक्का बसताना दिसत आहे.


घरात उरले 'हे' स्पर्धक
उमर रियाझच्या शोमधून बाहेर पडल्यानंतर आता राखी सावंत, करण कुंद्रा, शमिता शेट्टी, निशांत भट, तेजस्वी प्रकाश, रश्मी देसाई, देवोलीना भट्टाचार्जी आणि अभिजित बिचुकले घरात उरले आहेत.


संबंधित बातम्या


Pankaj Tripathi Web Series : पंकज त्रिपाठीने सुरू केले 'क्रिमिनल जस्टिस'चे शूटिंग, तिसरा भाग लवकरच होणार प्रदर्शित


Upcoming Movies and Web Series : 'मिर्झापूर सीझन 3' पासून 'गेहरियां'पर्यंत यावर्षी प्राइम व्हिडिओवर मनोरंजनाचा संपूर्ण डोस


Anu Aggarwal Birthday : एक अपघात अन् आयुष्याला कलाटणी; आशिकी गर्ल अनु अग्रवालबद्दलच्या खास गोष्टी


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha