एक्स्प्लोर
'बिग बॉस 10' सुरु होण्याची तारीख जाहीर
नवी दिल्लीः 'बिग बॉस 10' या बहुप्रतिक्षित मालिकेच्या आगमनाची प्रतिक्षा अखेर संपली आहे. 16 ऑक्टोबर रोजी कलर्स वाहिनीवर कार्यक्रम सुरु होणार असल्याची घोषणा कलर्सचे सीईओ राज नायक यांनी केली आहे.
राज नायक यांनी 'बिग बॉस 10' ची तारीख आणि सोबत प्रोमोही शेअर केला आहे. अखेर प्रतिक्षा संपली, 16 ऑक्टोबर म्हणजे रविवारी 'बिग बॉस 10' भेटीला येत आहे, असं राज नायक यांनी ट्विटरद्वारे सांगितलं आहे.
https://twitter.com/rajcheerfull/status/777134298772152320
प्रसिद्ध व्यक्तिंसोबतच यावेळी बिग बॉसचं व्यासपीठ सामान्यांसाठीही खुलं असणार आहे. बिग बॉसचा होस्ट म्हणून यावेळीही अभिनेता सलमान खान दिसणार आहे. 16 ऑक्टोबरला रात्री 9 वाजता सुरु होणाऱ्या 'बिग बॉस 10' ला सोमवार ते शुक्रवार रात्री 10.30 वाजता टीव्हीवर दाखवलं जाणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement