Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रम अनेकांसाठी स्वप्नपूर्तीचा मंच ठरतो आहे. बदलापूरच्या भारती दबडे यांनी 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर आयुष्यातली पहिली कमाई केली आहे. ज्ञानाच्या साथीनं सर्वकाही शक्य आहे हे त्यांनी त्यांच्या खेळातून प्रेक्षकांना दाखवून दिलं आहे.


भारती दबडेंनी केली 25,00,000 कमाई


'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात आतापर्यंत विविध क्षेत्रांतील आणि वयोगटांतील स्पर्धकांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. बदलापूरच्या भारती दबडे या गृहिणी आहेत. त्यांनी 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाच्या माध्यमातून आयुष्यातली पहिली कमाई केली आहे. भारती दबडे यांच्या उत्कृष्ट खेळाने गृहिणीनं ठरवलं तर ती काहीही करू शकते हे सिद्ध झालं आहे. 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर भारती दबडे यांनी आयुष्यातली पहिली कमाई केली आहे. या मंचावर त्यांनी 25,00,000 कमाई केली आहे. 




आता आली आहे आपली वेळ, ज्ञान आणि मनोरंजन यांचा अद्भुत खेळ!


'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळत असते. या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळतो. मागील वर्षी देखील या कार्यक्रमाच्या पर्वात अनेक ज्ञानी स्पर्धक सहभागी झाले होते आणि मोठी रक्कम त्यांनी जिंकली होती. यावर्षीदेखील संपूर्ण महाराष्ट्रातून उत्तम स्पर्धक सहभागी होणार आहेत.  'आता आली आहे आपली वेळ, ज्ञान आणि मनोरंजन यांचा अद्भुत खेळ', असे यंदाच्या पर्वाचं ब्रीदवाक्य आहे.  


कुठे पाहता येणार? सोनी मराठी (सोम-शनि रात्री 9 वाजता), सोनी लिव्ह ॲप


संबंधित बातम्या


Kon Honar Crorepati : ज्येष्ठ लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती येणार 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर


Kon Honaar Crorepati : काजोल आईला का घाबरते? 'कोण होणार करोडपती'च्या विशेष भागात होणार उलगडा