Kon Honaar Crorepati : काजोल आईला का घाबरते? 'कोण होणार करोडपती'च्या विशेष भागात होणार उलगडा

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या आगामी भागात काजोल आणि तनुजा खेळ खेळताना दिसणार आहेत.

Continues below advertisement

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) या कार्यक्रमाचे नवे पर्व नुकतेच सुरू झाले आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच आठवड्यात विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि लाडकी अभिनेत्री काजोल उपस्थित राहणार आहे. 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर पहिल्यांदाच या मायलेकीचा अनोखा बंध पाहायला मिळणार आहे. एबल डिसेबल ऑल पीपल टुगेदर' (ADAPT)  या संस्थेसाठी त्या 'कोण होणार करोडपती' हा खेळ खेळणार आहेत. काजोल आईला का घाबरते? याचा उलगडा  'कोण होणार करोडपती'च्या विशेष भागात होणार आहे. 

Continues below advertisement

काजोल आईला का घाबरते?

लहानपणी काजोल खूप मस्तीखोर होती. आईचं काहीच ऐकायची नाही. त्यामुळे तिने आईच्या हातचा खूप मार खाल्ला आहे. त्यामुळेच काजोलची रवानगी हॉस्टेलवर करण्यात आली. पाचगणीच्या शाळेतील शिक्षण, काजोलची वाचनाची तर तनुजाची विविध भाषा शिकण्याची आवड, निळू फुले आणि डॉ. श्रीराम लागू यांच्याबरोबर काम करण्याचा तनुजा यांचा अनुभव, काजोलच्या डोळ्यांचा किस्सा , काजोलच्या नावाची गंमत अशा अनेक  गोष्टींचा उलगडा 'कोण होणार करोडपती'च्या आजच्या विशेष भागात होणार आहे.

'कोण होणार करोडपती'च्या पहिल्या विशेष अतिथी भागात येणार काजोल आणि तनुजा

आपल्या सौंदर्य आणि अभिनय कौशल्याने रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी तनुजा आणि काजोल ही मायलेकींची जोडी आज 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच  विशेष अतिथी भागात सहभागी होणार आहेत.

लहानपणीची मस्तीखोर काजोल आईला का घाबरते? विशेष भागात प्रेक्षकांना मिळणार उत्तर

'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सचिन खेडेकर यांनी या पर्वातील पहिल्याच विशेष भागात तनुजा आणि काजोल यांना खुबीने बोलतं केलं आहे. लहानपणीची मस्तीखोर काजोल आईला का घाबरते, तनुजा यांना गुजराती, जर्मन, बंगाली इत्यादी दहा भाषा अस्खलित कशा काय बोलता येतात, त्यांना भाषांची आवड कशी निर्माण झाली, काजोल सेटवर धडपडली की सिनेमा हीट होतो, अशी अफवा सिनेमाक्षेत्रात अनेक वर्षं आहे यात त्यामध्ये कितपत तथ्य आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या पहिल्याच विशेष भागात मिळणार आहेत. 

कोण होणार करोडपतीचा विशेष भाग कधी होणार? 11 जून
किती वाजता? रात्री 9 वाजता
कुठे पाहायला मिळे? सोनी मराठी 

संबंधित बातम्या

Kon Honaar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर येणार काजोल आणि तनुजा; उलगडणार मायलेकींचे बंध

Kajol : 'मला फिल्म इंडस्ट्रीमध्ये यायचं नव्हतं'; 'कोण होणार करोडपती' कार्यक्रमात काजोलनं सांगितले किस्से

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola