एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 2 | मैथिली, माधव आणि अभिजीत, कोण होणार बेघर?

बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व सुरु होऊन आता 2 आठवडे झाले आहेत. पहिल्या आठवड्यात नॉमिनेशन्स झाले नसले तरी या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोण बेघर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई : बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व सुरु होऊन आता 2 आठवडे झाले आहेत. पहिल्या आठवड्यात नॉमिनेशन्स झाले नसले तरी या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोण बेघर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या आठवड्यात मैथिली जावकर, अभिजीत केळकर, पराग कान्हेरे, नेहा शितोळे, वीणा जगताप, माधव देवचक्के नॉमिनेट झाले आहेत. त्यापैकी मैथिली जावकर किंवा माधव देवचक्के या दोघांपैकी एकजण घराबाहेर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मैथिली जावकर चोर-पोलीस खेळामध्ये संचालक म्हणून अपयशी ठरली होती. तसेच त्यावेळी झालेली मारामारी ती थांबवू शकली नाही. मैथिलीच्या खेळामध्ये पारदर्शकता नसल्याची टीकादेखील केली जात आहे. कोणत्याही खेळात, वादात किंवा चर्चेत तिचा सहभाग नसतो. बिग बॉसच्या घरामध्ये टिकून राहण्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे असते. मैथिली त्यामध्ये कमी पडत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मैथिली जावकर बेघर होण्याची शक्यता जास्त आहे. माधव देवचक्केदेखील घराबाहेर जाण्याची शक्यता आहे. माधवला बिग बॉसच्या घरातील खेळ नीट समजलेला दिसत नाही. तसेच तो नेमका कोणाच्या बाजूने आहे, हे देखील अद्याप समजलेले नाही. बिग बॉसच्या घरात घडणाऱ्या घडामोडींमध्ये त्याच्याकडे त्याचा स्वतःचा आहे का? हे अद्याप कोणालाही समजलेले नाही. त्यामुळे देवचक्केलादेकील घराबाहेर पडावे लागू शकते. दरम्यान बिग बॉसच्या घरातील वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. 7 मे रोजी प्रसारित झालेल्या भागात अनेक वाद झाले. वीणा जगताप आणि शिवानी सुर्वेमध्ये झालेल्या वादामुळे बिग बॉसनी दोघींनाही अडगळीच्या खोलीत राहायला सागितले होते. परंतु तब्येतीचे कारण देत शिवानीने बिग बॉसची आज्ञा पाळण्यास नकार दिला. परंतु शिवानीने अडगळीच्या खोलीत जाण्यास नकार दिला तर शिवानीसह इतरांनाही परिणाम भोगावे लागतील अशी घोषणा बिग बॉसनी केल्यानंतर शिवानी अडगळीच्या खोलीत जाण्यास तयार झाली. अडगळीच्या खोलीत शिवानीसोबत बोलायला गेल्यालेल्या नेहासोबत तिचे भांडण झाले. भांडणांच्या या आराखड्यात सगळ्यांपासून अलिप्त असलेल्या पराग आणि रुपालीमध्ये कांदे-पोहे प्रश्नोत्तरांचा खेळ रंगला. यावेळी तुला लाईफ पार्टनर म्हणून शेफ आवडेल की अभिनेता? असा प्रश्न परागने रुपालीला विचारल्यानंतर 'एक अभिनेता जो शेफ आहे' असे उत्तर रुपालीने दिले. सतत होणाऱ्या वाद-भांडणांमध्ये रुपाली-परागची लव्हस्टोरी खुलणार का? याचीदेखील सर्वांना उत्सुकता आहे. शिवाय या आठवड्यात घराबाहेर कोण जाणार? याकडेही लक्ष आहे. नॉमिनेट झालेल्या सदस्यांमध्ये मैथिली जावकर घराबाहेर जाण्याची शक्यता जास्त आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Amitabh Bachchan On Wife Jaya Bachchan Anger: जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget