Anupamaa Spoiler Alert: समर आणि डिंपल यांच्या लग्नात लीला आणि कांतामध्ये होणार वाद; अनुपमा मालिकेत काय घडणार? जाणून घ्या...
'अनुपमा' मालिकेच्या आगामी एपिसोडमध्ये आणखी काय पाहायला मिळणार आहे? ते जाणून घेऊया...
![Anupamaa Spoiler Alert: समर आणि डिंपल यांच्या लग्नात लीला आणि कांतामध्ये होणार वाद; अनुपमा मालिकेत काय घडणार? जाणून घ्या... anupamaa spoiler alert There will be a dispute between Leela and Kanta Anupamaa Spoiler Alert: समर आणि डिंपल यांच्या लग्नात लीला आणि कांतामध्ये होणार वाद; अनुपमा मालिकेत काय घडणार? जाणून घ्या...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/06/5dc9e57f47baabf63f398a9baf9aeb391686042010274259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Anupamaa Spoiler Alert: छोट्या पडद्यावरील 'अनुपमा' (Anupamaa) या मालिकेमध्ये खूप ड्रामा पाहायला मिळत आहे. या मालिकेत अनेक ट्वीस्ट येत असतात. 'अनुपमा'या मालिकेच्या एपिसोडमध्ये लीला आणि कांताबेन एकमेकांशी भांडण करताना दिसणार आहेत. तर डिंपलच्या खऱ्या आईची देखील या मालिकेत एन्ट्री होणार आहे. तसेच अनुपमा या मालिकेत लीला ही डिंपलच्या आईचा खूप अपमान करताना दिसणार आहे. 'अनुपमा' मालिकेच्या 6 जूनच्या एपिसोडमध्ये आणखी काय काय पाहायला मिळणार आहे? ते जाणून घेऊया...
किंजल ही डिंपल म्हणजेच डिंपीला सांगते की, ती नवरीच्या लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे. किंजल डिंपीला असेही सांगते की, ती शहा कुटुंबाच्या घरी सून म्हणून नाही तर अनुपमाची मुलगी म्हणून आली आहे, त्यामुळे ती डिंपीला बहीण मानते.
लीला आणि कांता यांच्यात होणार वाद
तसेच 'अनुपमा'या मालिकेमध्ये दिसरणार आहे की, लीला ही भैरवीला पाहुण्यांना ज्युस द्यायला सांगते. हे पाहून कांताला राग येतो .ती भैरवीकडे जाऊन तिला मीनूसोबत खेळायला सांगते. यानंतर कांता ही लीलाला प्रश्न विचारते की ती मीनू आणि भैरवीमध्ये फरक का करते? लीला म्हणते मीनू तिला प्रिय आहे आणि भैरवी ही तिच्यासाठी अनोळखी आहे. त्यानंतर मीला आणि कांता यांना अनुपमा येऊन समजावते.
View this post on Instagram
'अनुपमा' (Anupamaa) या मालिकेचा प्रीमियर 13 जुलै 2020 रोजी झाला होता. गेली तीन वर्ष ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. रोमेश कालरा हे या मालिकेचे दिग्दर्शक आहेत. या मालिकेच्या कथानकाला आणि मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते.
अनुपमा मालिकेची स्टार कास्ट
अनुपमा (Anupamaa) या मालिकेमध्ये रुपाली गांगुली ही अनुपमा ही भूमिका साकारते तर वनराज ही भूमिका सुधांशू पांडे हा साकारतो. गौरव खन्ना हा या मालिकेत अनुज ही भूमिका साकारतो. अनुपमा मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. अनुपमा या लोकप्रिय मालिकेचा मराठीतही रिमेक करण्यात आला आहे. 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) असे या मालिकेचे नाव आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Anupama : 'अनुपमा' रंजक वळणावर; काव्या वनराजला देणार गुडन्यूज!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)