Anupamaa: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguly) यांच्या ‘अनुपमा’ (Anupamaa) या मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. अनुपमा मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. या मालिकेमध्ये अनेक वेळा ट्वीस्ट येत असतात. प्रेक्षकांच्या पसंतीची असणारी अनुपमा या मालिकेत प्रेक्षकांना बऱ्याच काळापासून अनुज आणि अनुपमा यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या नात्यातील दुरावा दूर होऊन ते कधी एकत्र येत आहेत याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
मागील भागामध्ये आपण पाहिले की अनुज अनुपमासमोर सगळे गैरसमज दूर करतो. परंतु त्यानंतर दोघेही नशिबावर सगळं सोडून आपआपल्या वाटेने निघून जाण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे आता प्रेक्षकांना खरचं अनुज आणि अनुपमा वेगळे होणार का की त्यांच्यात सर्व काही पुन्हा सुरळीत होईल हे पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.
अनुज आणि अनुपमा पुन्हा येणार एकत्र?
अनुपमाच्या पुढील भागामध्ये तुम्ही पाहू शकता की अनुज आणि अनुपमा शाह हाऊसमध्ये एकत्र येतील आणि कदाचित माया तुम्हाला पुन्हा एकदा प्रेमिकेच्या भूमिकेत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पण अनुपमा कदाचित यावेळी तिच्या हेतूंवर शंका घेईल आणि तिच्या सर्व खेळांचा पर्दाफाश करेल. तर अनुपमाची आई अनुपमाला सांगले की, 'माया,वनराज आणि बरखा हे तिघेही एकमेकांना मिळालेले आहेत.' त्यामुळे लवकरच प्रेक्षकांची उत्सुकता संपणार असून पुन्हा एकदा अनुपमा तिच्या सर्व संकंटावर मात करत जिंकताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अनुज आणि अनुपमा पुन्हा एकदा एकत्र येणार असून त्यांच्या विरुद्ध कटकारस्थानं करणाऱ्या लोकांना चांगलीच अद्दल घडताना पाहायला मिळणार आहे.
अनुपमाच्या येणाऱ्या भागांमध्ये तुम्ही पाहू शकता की मालती देवीसुद्धा समर आणि डिंपी यांच्या लग्नामध्ये पोहचते आणि त्यांच्यासमोर वनराज आणि बरखादेखील येतात. तर दुसऱ्या बाजूला बापू पुन्हा एकदा वनराजवर नाराज होतात. येणाऱ्या भागांमध्ये कदाचित समर आणि डिंपीच्या लग्नमंडपातच अनुज आणि अनुपमा लग्न केल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.