Aai Kuthe Kay Karte:  'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत वेगवेगळे ट्वीस्ट येत असतात. या मालिकेच्या गेल्या एपिसोडमध्ये  यशचा अपघात आहे, असं दाखवण्यात आलं होतं. सध्या यशवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आई कुठे काय करते या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, अनिरुद्ध हा यशची अवस्था बघून भावूक झाला आहे. 


आई कुठे काय करते या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की,  अनिरुद्ध हा हॉस्पिटलमध्ये यशजवळ बसला आहे. तेवढ्यात तिथे अशुतोष येतो. अशुतोषनं अनिरुद्धसाठी कॉफी आणलेली असते. तो अनिरुद्धतला म्हणतो, "मिस्टर देशमुख, कॉफी" त्यानंतर अनिरुद्ध म्हणतो, 'नको, यशला परत घरी घेऊन गेल्याशिवाय माझ्या घशाखाली काही उतरणार नाही. हा कधी कधी जगातील सगळ्यात मॅच्युअर मुलगा असल्यासारखा वागतो आणि दुसऱ्याचं क्षणी असं काही तरी करुन बसतो. तो खूप इमोशनल आहे, आर्टिस्ट आहे शेवटी. ' प्रोमोच्या शेवटी दिसत आहे की यश हा शुद्धीवर येतो आणि अशुतोषला काही तरी सांगण्याचा प्रयत्न करतो. 


एका नेटकऱ्यानं आई कुठे काय करते या मालिकेच्या प्रोमोला कमेंट केली,'भावूक होऊनही तो अरुंधतीबद्दल वाईट बोलणार, किती क्रूर' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली,'काकांचं काही कळतच नाही.. क्षणात असे तर क्षणत तसे...'


पाहा प्रोमो: 






'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधती ही भूमिका मधुराणी प्रभूलकर या साकरतात तर अनिरुद्ध ही भूमिका मिलिंद गवळी  हे साकारतात. तर  संजना ही भूमिका अभिनेत्री रूपाली भोसले ही साकारते. आई कुठे काय करते या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.आजही या मालिकेची चांगलीच क्रेझ आहे. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर असून या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे. 'आई कुठे काय करते' या मालिकेच्या कथानकला आणि या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.


संबंधित बातम्या


Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिका रंजक वळणावर; अनिरुद्ध आणि वीणा आशुतोषच्या ऑफिसमधून करणार काम