Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांत या मालिकेत वेगवेगळे ट्वीस्ट येत आहेत. आता या मालिकेत एक रंजक वळण येणार आहे. या मालिकेच्या आगामी भागात अनिरुद्ध आणि वीणा आशुतोषच्या ऑफिसमधून काम करताना दिसणार आहेत. 


'आई कुठे काय करते'च्या प्रोमोमध्ये काय आहे? (Aai Kuthe Kay Karte Promo)


'आई कुठे काय करते' या मालिकेचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये आशुतोष आणि नितीनसोबत वीणादेखील सकाळचा नाश्ता करताना दिसत आहे. दरम्यान अनिरुद्धदेखील त्यांच्या घरी येतो. त्यावेळी अनिरुद्ध वीणाला पुढचे काही महिने आपण आशुतोषच्या ऑफिसमधून काम करू असे म्हणतो. 


अनिरुद्धच्या या निर्णयाचा विणाला खूप आनंद होतो. त्यानंतर लगेचच आशुतोषला यासंदर्भात ती विचारते. आशुदेखील एका ऑफिसमध्ये काम करण्यास होकार देतो. पण नितीन आशुतोषला थांबवण्याचा प्रयत्न करतो. आशुतोषने घेतलेला निर्णय अरुंधतीला आवडणार नाही, असं तो त्याला सांगतो. पण तरीही आशुतोष एकत्र काम करण्यास तयार होतो.






वीणा आणि अनिरुद्ध आशुतोषच्या ऑफिसमध्ये एकत्र काम करत आहे, ही गोष्ट अरुंधतीला कळल्यानंतर ती काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. परदेशातून आल्यानंतर अरुंधती ऑफिसला जाणं बंद करणार का? याचं उत्तर मालिकाप्रेमींना मालिकेच्या आगामी भागात कळेल. 


'आई कुठे काय करते' ही मालिका गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकाचं मनोरंजन करत आहे. आजही या मालिकेची चांगलीच क्रेझ आहे. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर असून या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे. वीणाच्या एन्ट्रीने या मालिकेच्या कथानकात एक वेगळा ट्विस्ट आला आहे. आता या मालिकेत पुढे काय घडणार याची मालिकाप्रेमींना उत्सुकता आहे. या मालिकेत अरुंधतीच्या भूमिकेत मधुराणी प्रभूलकर तर अनिरुद्धच्या भूमिकेत मिलिंद गवळी आहेत. या दोन्ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. 


संबंधित बातम्या


Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेत मोठा ट्विस्ट; अरुंधती परदेशी जाताच यशने उचललं टोकाचं पाऊल