Ankita & Kunal Love Story : 'बिग बॉस' फेम अंकिता वालावलकर हिची सध्या लगीनघाई सुरु आहे. लवकरच ती तिचा बॉयफ्रेंड कुणाल भगत याच्याशी लग्न करणार आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर हिला बिग बॉस मराठी सीझन 5 मुळे खरी प्रसिद्धी मिळाली. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर अंकिताने कुणालसोबत तिच्या प्रेमाची कबुली दिली आणि त्यानंतर काही दिवसांतच लग्नाची घोषणा केली. आता अंकिता आणि कुणाल यांची लगीनघाई सुरु झाली आहे. दरम्यान, अनेकांना प्रश्न पडला आहे की कुणाल भगत आणि अंकिता वालावलकर यांची भेट कधी, कशी आणि कुठे झाली. तर या दोघांची लव्हस्टोरी जाणून घ्या.


अंकिता-कुणालचं प्रेम कसं जुळलं? 


अंकिता वालावलकर आणि कुणाल भगत लवकरच लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांची सध्या लग्नाची तयारी जोरदार सुरु आहे. यादरम्यान, अंकिता वालावलकर आणि कुणाल भगत यांनी 'लक्ष्मी निवास' मालिकेच्या सेटवर हजेरी लावली. या दरम्यान, अंकिता आणि कुणालने 'लक्ष्मी निवास' मालिकेतील लक्ष्मीची  भूमिका साकारणारी अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांची भेट घेतली. यावेळी अंकिताने स्वत:च कुणालसोबतच्या तिच्या प्रेमकहाणीचा उलगडा केला. अंकिता वालावलकरचा होणारा पती कुणाल भगत संगीत दिग्दर्शक आहे आणि त्याने 'लक्ष्मी निवास' मालिकेसाठी गाणं बनवलं आहे. यासोबतच त्याने अनेक मालिकांचं टायटल साँग बनवलं आहे.


पहिली भेट ते प्रेमकहाणी


लक्ष्मी निवास मालिकेच्या सेटवर लक्ष्मीची  भूमिका साकारणारी अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांची भेट घेतल्यावर अंकिताने तिच्या प्रेमकहाणीबद्दल सांगितलं. यावेळी अंकिताने त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगितलं की, अंकिता आणि तिची भेट एका अवॉर्ड शोमध्ये झाली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांची भेट झाली. त्यानंतर मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.


कोकण हार्टेड गर्लने सांगितली लव्हस्टोरी


अंकिताने हर्षदा खानविलकर यांना सांगितलं की, तिची आणि कुणालची भेट झी मराठीच्या अवॉर्ड शोमध्ये झाली. अंकिता झी मराठीसाठी एक अवॉर्ड शो होस्ट करत होती, त्या सोहळ्यात कुणाल भगतला पुरस्कार मिळाला होता. या कार्यक्रमात त्यांची भेट झाली आणि हळूहळू यांचं प्रेम फुललं.


अंकिता वालावलकर आणि कुणाल भगत यांनी 'लक्ष्मी निवास' मालिकेचं शीर्षक गीत बनवलं आहे. 'लक्ष्मी निवास' मालिकेचं शीर्षक गीत अंकिता वालावलकरने लिहिलं आहे, तर कुणाल भगतने याचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. या पार्श्वभूमीवर अंकिता वालावलकर आणि कुणाल भगत यांनी मालिकेच्या सेटवर हजेरी लावून कलाकारांची भेट घेतली. 




महत्त्वाच्या इतर बातम्या :


Priyanka Chopra : 'जेव्हा ती अंडरवेअर दाखवेल...'; 19 व्या वर्षी दिग्दर्शकाचं 'हे' वक्तव्य, अभिनेत्रीने शेअर केला 'तो' भयानक अनुभव