MTV Roadies XX : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिॲलिटी शो एमटीव्ही रोडीज शोचा नवा सीझन सुरु झाला आहे. एमटीव्ही रोडीज XX सुरु झाला असून या शोचा मोा चाहतावर्ग आहे. यातील गँग लीडर्सचीही मोठी फॅन फॉलोईंग आहे. शोदरम्यान गँग लीडर नेहा धुपियाची तब्येत बिघडल्याची माहिती समोर येत आहे. शोच्या सेटवर नेहा धुपिया अचानक चक्कर येऊन पडली. या शोच्या सेटवरील व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये नेहाची तब्येत बिघडल्याचं स्पष्ट दिसत आहे.
रोडीजच्या सेटवर नेहा धुपियाची तब्येत बिघडली
एमटीव्ही रोडीज या रिॲलिटी शोची शुटींग सध्या वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरु आहे. यामुळे अभिनेत्री नेहा धुपियाला घरापासून लांब असण्याला एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. एक महिन्यापासून अधिक काळापासून ती घरापासू आणि तिच्या बाळापासून दूर आहे. यादरम्यान, आता तिची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे. शोमध्ये नेहाची तब्येत बिघडली. या घटनेचा प्रोमो समोर आला असून त्यामध्ये दिसत आहे की, नेहाला सेटवर चक्कर येते. तिला अस्वस्थ वाटत असल्याचंही व्हिडीओमध्ये दिसत आहे. यामुळे सोशल मीडियावर खळबळ माजली आहे.
शूट सुरु असताना नेहाला आली चक्कर
शोच्या प्रोमोमध्ये ही घटना दाखवण्यात आल्याने इंटरनेटवरही त्याची जोरदार चर्चा होत आहे. यामध्ये दिसत आहे की, नेहा धुपियाला सेटवर चक्कर आली आणि ती बेशुद्ध पडली. मात्र, थोड्या वेळात ती उभी राहिली. तिने म्हटलं की, 'मी तंदुरुस्त आहे, ठीक आहे आणि MTV रोडीज XX मध्ये लीडर म्हणून काम करण्यास तयार आहे'.
'कोणतीही समस्या मला अडवू शकत नाही'
नेहा धुपिया 'रोडीज' या रिॲलिटी शोच्या सेटवर बेशुद्ध पडली. शोच्या प्रोमोमध्ये नेहा धुपियाची तब्येत बिघडल्याचे आणि ती बेशुद्ध पडल्याचे दाखवण्यात आलं होतं. मात्र, काही वेळाने ती शुद्धीवर आली आणि तिने पुन्हा शूटिंग सुरू केलं. अभिनेत्री नेहा धुपियाने सांगितलं की, कोणतीही समस्या तिला अडवू शकत नाही.
नेहानं सांगितलं कारण
या घटनेबद्दल बोलताना नेहा धुपियाने सांगितलं की, 'ही एक किरकोळ आरोग्य समस्या होती, पण मी पुन्हा माझ्या पायावर उभी आहे, नेहमीसारखीच प्रेरित आणि उत्साहित आहे. रोडीज नेहमीच मर्यादा ओलांडण्याबद्दल असते आणि हा प्रवास मला प्रत्येक अडथळ्यावर मात करण्यासाठी प्रेरित करतो. मला काहीही अडवणार नाही'.