Priyanka Chopra On Casting Couch : फिल्म इंडस्ट्री आणि कास्टिंग काऊच हे तसं खूप जुनं समीकरण आहे. अनेक दिग्गज अभिनेत्रींना त्याच्या सुरुवातीच्या दिवसात कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला आहे. बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिच्यासोबतही अशीच काहीशी घटना घडली होती. प्रियंकाने अनेकदा तिच्या फिल्म इंडस्ट्रीतील प्रवासाबद्दल उघडपणे सांगितलं आहे. अनेकदा तिने बॉलिवूडमध्ये तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळाबद्दलही सांगितलं आहे. आता पुन्हा एकदा अभिनेत्री प्रियंका चोप्राने करियरच्या सुरुवातीच्या दिवसातील तिचा भयानक अनुभव शेअर केला आहे. 

प्रियंका चोप्राने सांगितला 'तो' भयानक अनुभव

प्रियंका चोप्राने वेळोवेळी हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील वातावरण आणि बॉलिवूड यावर भाष्य केलं आहे. तिने अनेकदा सांगितलं आहे की, तिला फिल्म इंडस्ट्रीमध्ये राहण्यासाठी काय-काय सहन करावं लागलं. अलिकडेच फोर्ब्स पावर वीमेन समिटमध्ये प्रियंका चोप्राने तिच्यासोबत घडलेल्या भयानक आणि अपमानजनक घटनेबद्दल सांगितलं आहे. यावेळी प्रियंका म्हणाली की, ती 19 वर्षांची असताना एका दिग्दर्शकाने तिच्याबद्दल अश्लील भाषेत टिप्पणी केली होती. या घटनेमुळे तिला खूप दु:ख झालं आणि तिच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला होता.

प्रियांका चोप्राबद्दल दिग्दर्शकाचं 'हे' वक्तव्य

प्रियंका चोप्राने सांगितलं की, "मी 19 वर्षांची असताना मला एका अपमानजनक आणि अमानवीय घटनेला सामोरं जावं लागलं होतं. या घटनेनंतर त्यांनी स्व:तला खूप मजबूत केलं." एका चित्रपटाच्या शूटींग दरम्यान प्रियंकासोबत ही घटना घडली होती. प्रियंकाने या घटनेबद्दल सांगतात, तिच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. प्रियंकाने सांगितलं की, ही घटना खूपच दु:खद आणि अपमानजनक होती, यातून तिने स्वत:ला मजबूत बनवण्याचा निर्धार केला.

'जेव्हा ती अंडरवेअर दाखवेल, तेव्हाच...'

कास्टिंग काऊचच्या अनुभव सांगताना प्रियंका चोप्रा म्हणाली की, "चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, तिने दिग्दर्शकाला तिच्या स्टायलिस्टशी कपड्यांबद्दल बोलण्यास सांगितलं. पण दिग्दर्शकाने फोन उचलला आणि म्हणाला, 'ती जेव्हा तिची अंडरवेअर दाखवेल, तेव्हाच लोक तिला पाहण्यासाठी थिएटरमध्ये येतील.' कपडे इतके लहान असायला हवेत की अंडरवेअर दिसेल. त्याने हे अनेक वेळा पुन्हा सांगितलं. हे ऐकून मला खूप वाईट वाटले आणि मी आतून पूर्णपणे खचली. मी त्या रात्री घरी गेले आणि माझ्या आईला सांगितलं, 'मला या व्यक्तीचा चेहराही पाहायचा नाही'."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

हस्तर आणि दादी परतले... 'तुंबाड'नंतर सोहम शाहच्या नव्या चित्रपटाची घोषणा; 'क्रेझी'चा हटके प्रोमो समोर