Prasad Jawade : यंदा पार पडलेल्या झी मराठी पुरस्कार (Zee Marathi) सोहळ्यात अभिनेता प्रसाद जवादे (Prasad Jawade) याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. प्रसाद जवादे हा 'पारु' (Paaru) या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडूनही भरभरुन प्रेम मिळालं. त्यानंतर आता त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचाही पुरस्कार मिळाला आहे. प्रसादच्या या यशाचं त्याची पत्नी अमृता देशमुखने पोस्ट करत भरभरुन कौतुक केलंय.
काही महिन्यांपूर्वीच प्रसाद आणि अमृताने लग्नगाठ बांधली. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून ते दोघेही बरेच सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतच प्रसादचा त्याच्या ट्रॉफीसोबतचा फोटो अमृताने शेअर केला आहे.
अमृताची प्रसादसाठी खास पोस्ट
अमृताने प्रसादसाठी पोस्ट करत म्हटलं की, 'मी प्रसादच्या प्रेमात पडायच्या आधी त्याच्या डोळ्यांच्या प्रेमात पडले होते. अतिशय बोलके आणि भावपूर्ण डोळे..त्याच्यापेक्षा त्याचे डोळेच जास्त नीट व्यक्त होऊ शकतात.. खरंतर पारु मालिकेतला आदित्य बघताना त्रास होतो की, आत्तापर्यंत ज्या सगळ्या छटा मी बघत होते आज पुर्ण महाराष्ट्र बघतोय !'
पुढे त्याने म्हटलं की, 'आपल्या आवडीचं एखादं not-so-explored गाणं, अचानक viral झाल्यावर जो त्रास होतो तसं काहीसं, पण झी मराठी आणि "पारु"मुळे प्रसाद आज लोकांच्या मनात व्हायरल होतोय हे जाणवतंय आणि छान वाटतंय. लग्न झाल्याझाल्या मी त्याला साताऱ्यात वनवास भोगायला पाठवलं,खूप अडचणी आल्या, काही त्याने निर्माण केल्या..पण अॅक्शन-कटमध्ये त्याने कधीच तडजोड केली नाही आणि त्यामुळेच त्याने "सर्वोत्कृष्ट नायक" ह्या मृगाची शिकार केली !'
अमृता आणि प्रसादची लव्हस्टोरी जाणून घ्या... (Amruta Deshmukh Prasad Jawade Love Story)
अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात सहभागी झाले होते. या पर्वातील त्यांची रोमँटिक केमिस्ट्री चांगलीच गाजली. आता त्यांची ही केमिस्ट्री खऱ्या आयुष्यात सत्यात उतरली आहे. अखेर आज अमृता आणि प्रसाद थाटामाटात लग्नबंधनात अडकणार आहेत.
अमृता आणि प्रसाद 'बिग बॉस'मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. पण या पर्वात त्यांची चांगली मैत्री झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं. पण त्यांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबूली दिली नाही. अखेर एकदिवस साखरपुड्याचा फोटो शेअर करत त्यांनी त्यांचं नातं जगजाहीर केलं.