Neena Kulkarni Death News Viral : मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनात पोहोचलेल्या कलाकार म्हणजे अभिनेत्री नीना कुळकर्णी. त्यांनी अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. नीना कुळकर्णी यांनी त्यांच्या वास्तववादी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री नीना कुळकर्णी यांच्या निधनाच्या बातम्या समोर येत असून सोशल मीडियावर त्या व्हायरल केल्या जात आहे. यावर अनेकांनी दु:ख आणि संवेदनाही व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्री नीना कुळकर्णी या जिवंत असून त्यांनी निधनाच्या अफवांना पूर्णविराम दिला आहे.


प्रसिद्ध अभिनेत्रीच्या निधनाची अफवा


अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी निधनाच्या बातम्या खोट्या असल्याचं सांगत स्वत: जिवंत असल्याची ग्वाही दिली आहे. नीना कुळकर्णी यांचं निधन झाल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यूट्यूबर नीना कुळकर्णी यांचं निधन झाल्याची खोटी बातमी पसरवण्यात आली आहे.


अभिनेत्री नीना कुळकर्णी यांच्या निधनाची अफवा?


दरम्यान, या व्हायरल बातम्या आणि अफवांना कंटाळून नीना कुळकर्णी यांनी यावर मौन सोडलं आहे. निधनाच्या बातम्या खोट्या असल्याचं नीना कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. नीना कुळकर्णी यांनी सोशल मीडियावरील अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे.


सोशल मीडियावर द्यावी लागली जिवंत असल्याची ग्वाही


नीना कुळकर्णी यांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अफवांसंदर्भात पोस्ट करत लिहिलंय, "यूट्यूबरवर माझ्या निधनाची खोटी बातमी दाखवली जात आहे. देवाच्या कृपेने मी जिवंत आहे आणि पूर्णपणे ठणठणीत असून कामामध्ये व्यस्त आहे. कृपया अशाप्रकारच्या अफवांकडे लक्ष देऊ नका आणि त्यांना प्रोत्साहनही देऊ नका. मला दीर्घायुष्य मिळू दे".


नीना कुळकर्णी यांच्या मालिका आणि चित्रपट


नीना कुळकर्णी या सध्या येड लागलं प्रेमाचं मालिकेत मंजिरीच्या आईची भूमिका साकारत आहे. त्यांनी 'ये हैं मोहब्बते', 'थोडा है थोडे की जरूरत है' या हिंदी मालिकांमध्ये काम केलं.  ध्यानीमनी, हमिदाबाईची कोठी, छापा-काटा, वाडा चिरेबंदी या त्यांच्या नाटकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. गोदावरी, उत्तरायण, पाँडीचेरी, देवी, फोटो-प्रेम यासारख्या मराठी चित्रपटांध्ये काम केलं आहे. मिर्च मसाला, पुरुष, दायरा, दाग, बादल, फिर भी दिल है हिंदुस्तानी, नायक, हम हो गये आपके, क्या दिलने कहा, मेरे यार की शाही हैं, हंगामा, दम यासारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सातच्या आत घरात, आधारस्तंभ, सवत माझी लाडकी, उत्तरायण या मराठी चित्रपटांमध्येही नीना कुळकर्णी यांनी काम केलं आहे.






 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


सुपरस्टार थलपती विजय होणार तमिळनाडूचा पुढचा मुख्यमंत्री! अभिनेत्याच्या रोखठोक भाषणानंतर चाहत्यांमध्ये उत्साह