Amitabh Bachchan On KBC 15 : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) रुपेरी पडदा गाजवण्यासह छोट्या पडद्यावरही अॅक्टिव्ह आहेत. बिग बी सध्या 'कौन बनेगा करोडपती 15' (Kaun Banega Crorepati 15) हा कार्यक्रम होस्ट करत आहेत. या कार्यक्रमाच्या मंचावर ते व्यावसायिकसह वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करत असतात. आता या कार्यक्रमाच्या मंचावर त्यांनी घरातील काम करण्याबद्दल भाष्य केलं आहे. 


'केबीसी'च्या मंचावर असलेला हर्ष शाह नामक स्पर्धक अमिताभ बच्चन यांना थेट प्रश्न विचारतो की,"तुम्ही कधी घरातील भांडी घासली आहेत का? यावर उत्तर देत अमिताभ बच्चन म्हणतात,"मी आजवर अनेकदा भांडी घासली आहेत. स्वयंपाकघरातील चिमनी साफ केली आहे. बाथरूममधील बेसिनदेखील साफ केलं आहे. मी घरातील काम करू शकत नाही, असं तुम्हाला का वाटलं?". 


अमिताभ बच्चन यांच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घ्या... (Amitabh Bachchan Upcoming Project)


अमिताभ बच्चन वयाच्या 81 व्या वर्षीदेखील मनोरंजनसृष्टीत अॅक्टिव्ह आहेत. टायगर श्रॉफ आणि कृती सेननच्या 'गणपत' या सिनेमात ते शेवटचे झळकले होते. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. पण या सिनेमातील बिग बींच्या कामाचं कौतुक झालं. अमिताभ बच्चन आता प्रभास-दीपिकाच्या 'कल्कि 2889 एडी' या सिनेमात झळकणार आहेत. तसेच रजनीकांतसोबत ते 'थलायवा 170' या सिनेमात स्क्रीन शेअर करताना दिसतील.






अमिताभ बच्चन अनेकदा 'केबीसी 15'च्या मंचावर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासंबंधित गोष्टींवर भाष्य करत असतात. याआधी एका स्पर्धकासोबत बोलताना ते म्हणाले होते,"बीएसीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मी दिल्लीहून चंदीगढला सायकलवरून गेलो होतो. त्यानंतर तिथे अॅडमिशन न मिळाल्याने मी पुन्हा दिल्लीला आलो. शेवटी दिल्लीच्याच कॉलेजमध्ये मला प्रवेश मिळाला". 


'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati 15) हा कार्यक्रम 2000 पासून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. 2000 पासून आजही या कार्यक्रमाची क्रेझ कायम आहे. अमिताभ बच्चन पहिल्या पर्वापासून हा कार्यक्रम होस्ट करत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना आता उत्सुकता आहे. या सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 


संबंधित बातम्या


Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनाही जडली रिल्सची सवय; म्हणाले,"दररोजचे दोन-तीन तास वाया जातात"