Amitabh Bachchan Addicted to Social Media Watching Reel : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या चर्चेत आहेत. तरुणांप्रमाणे लहानमुलांनाही रिल्सचं वेड लागलं आहे. एवढचं नव्हे तर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चनदेखील (Amitabh Bachchan) रिल्सच्या प्रेमात पडले आहेत. 'कौन बनेगा करोडपती 15'च्या (Kaun Banega Crorepati 15) मंचावर त्यांनी यासंदर्भात खुलासा केला आहे.


'केबीसी 15'च्या (KBC 15) मंचावर अमिताभ बच्चन यांनी खुलासा केला आहे की,"ब्लॉग लिहायला घेतो तेव्हा सोशल मीडियावरील रील्स मला खुनावतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून
इतरांच्या आयुष्यात डोकावायला मला आवडतं. यात दोन-तीन तास कसे निघतात हे कळत नाही". 


अमिताभ बच्चन पुढे म्हणाले,"एक-दोन वर्षांआधी मी माझ्या वाक्यांच्या खूप तालमी करत असे. पण आता मी तालमी करण्यापेक्षा तो वेळ फोनवर घालवतो. पण आता मी फोनचा आणि सोशल मीडियाचा कमीत कमी वापर करण्यावर भर देतो". 






अमिताभ बच्चन यांची वाईट सवय


'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाचे होस्ट अमिताभ बच्चन म्हणाले की,"सोशल मीडियामुळे मला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रत्येक गोष्टीवरचं मत सोशल मीडियावर मांडण्याची वाईट सवय मला लागली आहे". 


अमिताभ बच्चन यांच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Amitabh Bachchan Upcoming Movies)


'केबीसी' (KBC) सारख्या कार्यक्रमांसोबतच बिग बी हे वेगवेगळ्या चित्रपटांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येतात. काही दिवसांपूर्वी त्यांंचे ब्रह्मास्त्र आणि गुडबाय हे चित्रपट रिलीज झाले. तसेच अमिताभ बच्चन यांचा ऊंचाई हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. 


अमिताभ बच्चन यांचा 'कल्कि 2898 एडी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ते दाक्षिणात्य अभिनेते प्रभाससोबत (Prabhas) झळकणार आहेत. या सिनेमात ते दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि कलम हासनसोबत (Kamal Haasan) स्क्रीन शेअर करताना दिसतील. तसेच रजनीकांतच्या आगामी सिनेमातही ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. बिग बींच्या आगामी सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 'सेक्शन 84' या चित्रपटात देखील अमिताभ बच्चन काम करणार आहेत, असं म्हटलं जात आहे.


संबंधित बातम्या


Kaun Banega Crorepati : 'कौन बनेगा करोडपती'चे पहिले करोडपती हर्षवर्धन नवाथे आज काय करतात? पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री