एक्स्प्लोर

BTS Army, KBC 14 : ‘केबीसी 14’च्या मंचावर अमिताभ बच्चन यांनी विचारला ‘BTS’बद्दल प्रश्न! तुम्हाला माहितेय का उत्तर?

KBC 14 : कोरियन पॉप बँड ‘BTS’चे चाहते केवळ कोरियातच नाहीत तर, जगभरात पसरलेले आहेत. या म्युझिक बँडच्या टीमने चाहत्यांना अक्षरशः आपलं वेड लावलं आहे.

KBC 14 : कोरियन पॉप बँड ‘BTS’चे चाहते केवळ कोरियातच नाहीत तर, जगभरात पसरलेले आहेत. या म्युझिक बँडच्या टीमने चाहत्यांना अक्षरशः आपलं वेड लावलं आहे. तर, चाहते देखील बीटीएस हे नाव ऐकताच उत्साहित होतात. नुकताच ‘केबीसी 14’च्या (KBC 14) मंचावर महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी ‘BTS’बद्दल एक प्रश्न विचारला, जो ऐकून चाहते देखील आनंदित झाले.

मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या लोकप्रिय गेम शो 'कौन बनेगा करोडपती 14'मध्ये (KBC 14) के-पॉपचे बादशाह म्हणवणाऱ्या BTS बद्दल प्रश्न विचारला. त्यानंतर भारतातीलच नव्हे, तर जगभरातील BTS चाहत्यांना आनंद झाला. सध्या हा प्रश्न सोशल मीडियावर देखील चर्चेत आहे.

काय होता प्रश्न?

या शो दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या समोर बसलेल्या एका महिला स्पर्धकाला विचारले की, 'जिन, सुगा आणि जे-होप असे तीन सदस्य असलेला BTS बँड कोणत्या आशियाई देशाचा आहे?' ज्याच्या उत्तरासाठी चार पर्याय देण्यात आले होते. A. दक्षिण कोरिया, B. इराण, C. श्रीलंका आणि D. मंगोलिया. स्पर्धक तरुणीने लगेचच त्याच्या उत्तरात दक्षिण कोरियाला ए. यावर लॉक करण्यास सांगितले. तर, अमिताभ यांनी यांनी देखील गंमतीच्या स्वरात स्पर्धकाला म्हटले की, हा पर्याय देण्याआधीच तुमच्या चेहऱ्यावर हसू आले होते.

पाह व्हिडीओ :

स्पर्धकाने याचे अचूक उत्तर दिल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी बीटीएस बँडचे पूर्ण नाव देखील सांगितले. बीटीएसचे पूर्ण नाव ‘बंगतान सोनियोंदन’ असे आहे. त्यानंतर स्पर्धक तरुणीने देखील बिग बींना म्हटले की, तिला के-पॉप खूप आवडते. यावर अमिताभ बच्चन यांनी तिला विचारले की, हे के-पॉप नक्की काय आहे? तर, तिने याचे उत्तर देखील दिले. या व्हिडीओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे. अमिताभ बच्चन यांच्या तोंडून के-पॉप बँडचे नाव ऐकून बीटीएस बँडच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. शोच्या या व्हिडीओमध्ये दिसते की, बिग बींनी स्पर्धक तरुणीला 5000 रुपयांसाठी हा प्रश्न विचारला होता, ज्याचा व्हिडीओ आता प्रचंड व्हायरल होत आहे.

केबीसीचा 14वा सीझनही लोकप्रिय!

क्विझ शो 'कौन बनेगा करोडपती' हा छोट्या पडद्यावरचा असा एक रिअॅलिटी शो आहे, जो लोकांचे मनोरंजन करण्यासोबतच त्यांच्या ज्ञानात देखील भर घालतो. हा शो सुरू झाल्यापासून भारतातील लोक या व्यासपीठावर येण्यास उत्सुक आहेत. अनेक लोकांसाठी, हे व्यासपीठ त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे टर्निंग पॉइंट ठरते. या मंचावर जिंकलेल्या बक्षिसाच्या रकमेने अनेकांचे भविष्य बदलले आहे. सध्या या शोचा 14वा सीझन सुरु आहे.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:

Amitabh Bachchan : 'कौन बनेगा करोडपती' चं सूत्रसंचालन करण्यासाठी बिग बी किती घेतात मानधन? जाणून घ्या...

महत्त्वाच्या बातम्या

Lock Upp 2 Akanksha Chaudhary : 'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
Crime Patrol Satish Naikode: 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
Subodh Bhave On Sai Tamhankar: 'सई ताम्हणकर इंडस्ट्रीत कितपत टिकेल, याबाबत मला शंका...'; सुबोध भावेनं स्पष्टीकरणासह दिलं कारण, नेमकं काय म्हणाला?
'सई ताम्हणकर इंडस्ट्रीत कितपत टिकेल, याबाबत मला शंका...'; सुबोध भावेनं स्पष्टीकरणासह दिलं कारण, नेमकं काय म्हणाला?
Kushal Badrike On Female Character In Chala Hawa Yeu Dya: 'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; 'चला हवा येऊ द्या'बाबत नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget