Aai Kuthe Kay Karte Updates : एका महिलेची काय चेष्टा लावलीय, 'आई कुठं काय करते' मालिकेतील ट्वीस्टवर प्रेक्षक संतापले
Aai Kuthe Kay Karte Updates : 'आई कुठं काय करते' मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या मालिकेतील ट्वीस्टवर प्रेक्षक संतापले आहेत. प्रेक्षकांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
Aai Kuthe Kay Karte Updates : टीआरपीच्या शर्यतीत राहण्यासाठी छोट्या पडद्यावर सध्या नव्या मालिका सुरू आहेत तर काही लाँच होणार आहेत. तर, दुसरीकडे सध्या सुरू असलेल्या मालिकांच्या कथानकात बदल होत आहेत. छोट्या पडद्यावर लोकप्रिय असलेली 'आई कुठं काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेची वेळ बदलली जाणार आहे. नव्या वेळेत मालिका सुरू होत असताना या मालिकेच्या कथानकात मोठे बदल होणार आहेत. नव्या प्रोमोनुसार, अरुंधतीचा नवरा आशुतोषचे निधन झाल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यावर प्रेक्षकांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे.
'आई कुठं काय करते' मध्ये आता मोठा ट्वीस्ट येणार आहे. मालिकेची वेळ बदलण्यात आल्यानंतर आता कथानकातही बदल होत असल्याचे संकेत या नव्या प्रोमोमध्ये, आता अरुंधतीवर दु:खाचा डोंगर कोसळणार आहे. मालिकेत आशुतोषचे निधन झाल्याचे दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे आता आशुतोषच्या निधनानंतर अरुंधतीच्या नव्या प्रवासाला सुरुवात होणार आहे.
'आई कुठं काय करते' च्या नव्या प्रोमोत काय?
नव्या प्रोमोत आशुतोषच्या फोटोवर हार घातला गेला आहे. आशुतोषच्या निधनाने अरुंधती कोलमडून पडली आहे. तर, आशुतोषची आई सुलेखा ही अरुंधतीला जबाबदार धरत तिला घराबाहेर जाण्यासाठी सांगते. त्यामुळे अरुंधती आणखीच कोलमडून जाते. त्याच वेळी तिची आधीची सासू अर्थात अनिरुद्धची आई तिला जवळ करते आणि मी माझ्या मुलीला घेऊन जाणार असल्याचे सांगते.
प्रेक्षकांचा संताप
मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावरील विविध अकाउंट्सवर शेअर करण्यात आला आहे. त्यावर प्रेक्षकांची आपल्या प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने आशुतोष मरणार आहे असं दाखवणार असतात तर कृपया सीरियल बंद करा असे म्हटले. अजून किती प्रवास करणार आहे अरुंधती बस कर बाई आता कंटाळा आला ना असेही एकाने उपरोधिकपणे म्हटले. एका महिला युजरने ही मालिका खूपच बोअरिंग झाली असल्याचे म्हटले. तर आणखी एका महिला युजरने तुम्ही एका स्त्रीची चेष्टा लावली आहे. आधी तीचे लग्न होतं तो नवरा दुसरे लग्न करतो आणि आता तो नवरा पण मरतो, असे या युजरने म्हटले. एका युजरने आता सगळं किळसवाणे होत चालले असल्याचे सांगितले. अरुंधतीचे आणखी 4-5 लग्न लावा अशी संतप्त प्रतिक्रिया एका युजरने दिली.
'आई कुठं काय करते' नव्या वेळेत
आई कुठं काय करते ही मालिका 18 मार्चपासून ही मालिका सोमवार ते शनिवार दरम्यान दुपारी 2.30 वाजता ही मालिका प्रक्षेपित होणार आहे. ही मालिका संध्याकाळी 7.30 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. पण या मालिकेचा मेन स्लॉट काढून घेण्यात आला. या मालिकेच्या जागी आता 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका सुरू होणार आहे.