Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडवी यासाठी निर्माते वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. मालिकेत सध्या ईशा आणि अनिशच्या लग्नाची तयारी सुरू आहे. लवकरच ते लग्नबंधनात अडकणार असल्याने दोघांच्याही घरी लगीनघाईला सुरुवात झाली आहे. दरम्यान मालिकेच्या आगामी भागात साखरपुड्याच्या खर्चावरुन पुन्हा एकदा अरुंधती आणि अनिरुद्धमध्ये वाद होणार आहे. 


दिवसेंदिवस वाढतच चाललाय ईशाचा हट्ट


ईशाने तिचा साखरपुडा शाही थाटात करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे साखरपुड्याची खरेदी करताना प्रत्येक गोष्ट ती हट्टाने विकत घेत आहे. अनिशसाठी तिला सोन्याच्या अंगठीऐवजी हिऱ्याची अंगठी हवी आहे. हिऱ्याच्या अंगठीसाठी ती हट्ट करत आहे. एकंदरीतच दिवसेंदिवस ईशाचा हट्ट वाढतच चालला आहे. 






'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. मालिकेत अरुंधती आणि आशुतोष यांच्यातील नातं बहरत आहे. तर दुसरीकडे ईशा आणि अनिशचा लग्नसोहळा लवकरच पार पडणार आहे. अरुंधती आणि अनिरुद्धप्रमाणे ईशा आणि अनिशच्या साखरपुड्यासाठी प्रेक्षकदेखील उत्सुक आहेत. 


गेल्या दोन वर्षांपासून अनिरुद्ध नोकरी करत नाही आहे. हे माहीत असूनही ईशाला तिला साखरपुडा आणि लग्नसोहळा थाटामाटात करायचा आहे. त्यामुळे आता लेकीच्या आनंदासाठी अनिरुद्ध मालिकेच्या आगामी भागात ईशाला हवे असलेले दागिने आणि कपडे घेऊन येईल. 


अरुंधती आणि अनिरुद्धमध्ये होणार वाद


अनिरुद्धने ईशासाठी दागिने आणि कपडे आणल्यामुळे अरुंधती त्याच्यासोबत भांडताना दिसणार आहे. अरुंधतीप्रमाणे संजनादेखील साखरपुड्यासाठी एवढा खर्च का केला असा प्रश्न विचारणार आहे. त्यावर आपल्या आनंदासाठी मुलांचं मन मारुन त्यांना जगायला सांगायचं हे मला पटत नाही असं अनिरुद्ध सांगणार आहे. त्यावर अरुंधती म्हणते,"विषय खर्चाचा नसून गरजेचा आहे. बापाने पैसे कमावले म्हणून ते मुलांनी उधळायचे असं होत नाही". अरुंधती आणि अनिरुद्धच्या वादामुळे प्रेक्षकांना मात्र मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. 


संबंधित बातम्या


Aai Kuthe Kay Karte: लग्न करताना पत्रिका पहायची की नाही यावर मतमतांतर; 'आई कुठे काय करते !'चा प्रोमो व्हायरल